शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सावधान ! व्हॉट्सअ‍ॅप पडताळणीचे मेसेज आहेत फेक; रिप्लाय दिला तर अकाऊंट होईल हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 2:41 PM

सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा 

ठळक मुद्देअसे मेसेज पाठविणाऱ्यांपासून सावधानसहा अंकी कोड हॅकर्सला देणे धोक्याचे 

औरंगाबाद : व्हॉट्सअ‍ॅपची पडताळणी करायची असल्याचे सांगून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याला सहा अंकी मेसेज (व्हेरिफिकेशन कोड) पाठवून तो कोड विचारून घेत व्हॉट्सअ‍ॅपवर ताबा (अ‍ॅक्सेस ) घेण्याचा नवीन फंडा सायबर गुन्हेगार वापरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा अधिकृत मेसेज असल्याचे समजून शहरातील अनेकांनी त्यांना आलेला सहा अंकी नंबर हॅकर्सला पाठविल्याने त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक झाले.

व्हॉट्सअ‍ॅपकडून अशी कोणतीही पडताळणी केली जात नसल्याने, अशा मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील हजारो व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना,  ''We have sent you a request for identity verification.'' The six-digit verification is used to activate a WhatsApp account on a new device. असा मेसेज प्राप्त होत आहे.हा मेसेज खरा वाटावा याकरिता हॅकर्स मेसेजमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे आयकॉन दर्शवितात. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने मेसेज पाठवल्याचे समजून मोबाईलवर आलेला सहा अंकी कोड मेसेज अनेक जण परत (हॅकर्सला ) पाठवतात. 

हा कोड प्राप्त होताच हॅकरला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप खात्याचा अ‍ॅक्सेस प्राप्त होतो. सायबर तज्ज्ञ निरंजन चाबुकस्वार यांनी सहा अंकी कोड हॅकर्सला देणे वापरकर्त्यासाठी धोक्याचे असल्याचे नमूद केले. हॅकर्स अ‍ॅक्सेस मिळवून त्या व्हॉट्सअ‍ॅपमधील डाटा आणि वैयक्तिक माहिती, छायाचित्र, व्हिडिओ आणि मित्रांची माहिती चोरतात. हॅकर तुमच्या मित्रांना असे व्हेरिफिकेशन कोडचे मेसेज पाठवितात आणि त्यांचेही व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही व्हेरिफिकेशन कोड शेअर केला असेल तर तात्काळ व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये जाऊन तुमच्या मोबाईल नंबरची पुन्हा पडताळणी करा आणि नवीन कोड मिळवून पोलिसांशी संपर्क  साधावा.

हॅकर्स कशी करतात फसवणूक ?व्हॉट्सअ‍ॅप हॅक केल्यानंतर त्याच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांच्या नंबरवर हॅकर्स तुमच्या अकाउंटवरून सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड पाठवतात. चुकून मेसेज तुला पाठवला आहे तो मेसेज परत पाठव, असे सांगतात. मित्राच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज असल्याचे समजून तो सहा अंकी क्रमांक परत पाठविताच तो मित्रही हॅकर्सची शिकार होतो. त्याचाही व्हॉट्सअ‍ॅप हॅक होतो. असे सायबरतज्ज्ञ शैलेश दहिवाल यांनी सांगितले.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद