शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कर्जास जामीनदार होताना घ्या काळजी; तुम्हालाही बसू शकतो फटका!

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 01, 2024 6:45 PM

कर्ज परतफेड न झाल्यास जामीनदारावरही कारवाई

छत्रपती संभाजीनगर : अनेकांचा सर्वांना सहकार्य करून व कोणाच्या भावना दुखावण्याचा स्वभाव नसतो, यामुळे अनेक जण नातेवाईक, मित्रांनी घेतलेल्या कर्जाचे जामीनदार होतात. मात्र, आता जामीनदार होताना थोडे सावधान व्हावे लागणार आहे. कारण, काही कारणास्तव कर्ज थकीत झाले तर ती रक्कम त्या जामीनदाराकडून वसूल केली जाऊ शकते.

कर्ज परतफेड न झाल्यास जामीनदारावरही कारवाईकर्ज घेणाऱ्याचे क्रेडिट स्कोअर समाधानकारक नसेल किंवा सर्वांत कमी असेल अशा वेळी बँक त्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला जामीनदार आणण्यास सांगते. जर तो कर्जदार घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर अशा वेळेस बँक जामीनदाराकडून कर्जाची रक्कम वसूल करते.

सिबिलला बसू शकतो फटकाएखाद्याला कर्ज घेण्यासाठी जामीनदाराने त्याची हमी घेतलेली असते. तेव्हाच बँक कर्ज देते. कर्ज घेणाऱ्याने कर्जाची परतफेड केली नाही तर अशा वेळी जामीनदाराकडून वसूल केली जाते. तसेच जामीनदाराच्या सिबिल स्कोअरवरही परिणाम होतो. यामुळे जामीनदाराला पुढे कोणतेही कर्ज घेताना अडचण येऊ शकते.

किती असावा सिबिल स्कोअर ?उत्कृष्ट : ७०० च्यापुढे ८५० दरम्यान.सरासरी : ६०० ते ७५० दरम्यान.सर्वांत कमी : ३०० ते ५८० दरम्यान.

जामीनदार होताना काय काळजी घ्याल?आपण ज्या व्यक्तीच्या कर्जाचे जामीनदार राहणार आहे त्या व्यक्तीचा आधीचे रेकॉर्ड तपासावे. कर्जदाराने घेतलेल्या कर्जाची परतफेड तो वेळेवर करू शकतो का, जेवढे कर्ज घेतले आहे तेवढी फेडण्याची क्षमता कर्जदारात आहे का, त्याने कशासाठी कर्ज घेतले या सर्व बाबी जाणून घेणे आवश्यक आहे.

जामीनदार म्हणजे कर्जफेडीची हमीएखाद्याने कर्ज घेतले व त्याचा जामीनदार कोणी होत असेल तर बँकेच्या दृष्टीने तो जामीनदार म्हणजे कर्जफेडीची हमीच असतो. भविष्यात कर्जदाराने ईएमआय थकविला तर त्याचा परिणाम जामीनदाराच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. यासाठी जर कोणाच्या कर्जाची हमी घेत असाल तर तो व्यक्ती वेळेवर ईएमआय भरतो की नाही, याचा पाठपुरावा करणे जामीनदाराचे कर्तव्य आहे.- रोहन आचलिया, सीए

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद