कार्यक्षमता वाढवणार:
औरंगाबाद : जिल्ह्यातील ७० टक्के कर्मचारी पंचायत राज व्यवस्थेत काम करत असून दिवसभरातील एक तृतीयांश वेळ ते कार्यालयाला देतात. या ठिकाणी स्वच्छ, सुंदर व पोषक वातावरण असल्यास कर्मचा-र्यांच्या मनःस्थितीवर चांगला परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता वाढवून जनतेला लाभ होईल. यासाठी विभागीय आयुक्तांना सुंदर माझे कार्यालय उपक्रम जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच्या कार्यालयांत घेतला आहे.
विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेनुसार सुंदर माझे कार्यालय हे अभियान जिल्हा परिषकदेच्या सर्व विभाग व पंचायत समितीच्या अखत्यारितील कार्यालयांत राबवण्यात येत आहे. २८ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान हे अभियान असणार असून उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांची शुक्रवारी बैठक घेवून अभियानाच्या मार्गदर्शन केले, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी दिली. त्या दृष्टीने कार्यालयांची स्वच्छतेला जिल्हा परिषदेत सुरवात करण्यात आली.
चौकट..
कायापालटाचा प्रयत्न
कार्यालयाची आंतरबाह्य स्वच्छता, त्यात कर्मचा-र्यांचा सहभाग, आकर्षक रचना, रंगरंगोटी, रेनवाॅटर हार्वेस्टींग, सोलार, एलईडीचा वापर, सर्व कार्यालयांची रंगसंगती, झिरो पेंडन्सी, संचिका अद्ययावतीकरण, सहागठ्ठे पद्धतीने दप्तराची रचना, पेपरलेस, शंभर टक्के संगणकाचा वापर करणे या उपक्रमात अपेक्षित आहे. त्यातून गुणांकण पद्धतीने जिल्ह्यातील पहिले कार्यालय निवड करण्यासोबत कार्यालयांचा कायापालट करण्याचा उपक्रमातून प्रयत्न होत आहे.