शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

आयुर्वेदिक डॉक्टरचा फौजदार झालो; पण उपअधीक्षकाच्या स्वप्नाने स्वस्थ बसू दिले नाही...

By सुमित डोळे | Published: May 16, 2024 4:38 PM

माझा टर्निंग पॉईंट: पोलिस विभागात सामान्यांची थेट व तत्काळ सेवा करण्याची संधी मिळते, हे जवळून अनुभवले होते.

- डॉ. रणजित पाटील, सहायक पोलिस आयुक्त

बारावीनंतर धुळ्याच्या शिरपूर येथील आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध डॉ. कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाला. खोलीवरचे दोन मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे. तेव्हा माझा अप्रत्यक्ष का होईना; स्पर्धा परीक्षेच्या तयारीशी संबंध येत होता. साताऱ्याला आयुर्वेदिकची प्रॅक्टिस सुरू असतानाच २०११ मध्ये उपनिरीक्षक तर २०१२ मध्ये एसटीआय उत्तीर्ण झालो. 

अनेक जण पुढे महसूल व अन्य विभागांसाठी प्रयत्न करण्यास सांगायचे. परंतु पोलिस विभागात सामान्यांची थेट व तत्काळ सेवा करण्याची संधी मिळते, हे जवळून अनुभवले होते. त्यामुळे उपअधीक्षक होण्याचे स्वप्नाने स्वस्थ बसू दिले नाही. पोलिस अधिकारी असलेले वडील व सोबतच्या मित्रांमुळे पोलिस अधिकारी होण्याचे खरे वेड लागले व २०१४ मध्ये मी उपअधीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झालो.

१९७२ च्या दुष्काळात माझे वडील पोलिस विभागात रुजू झाले होते. पोलिस विभागाचे काम, समाजासाठी समर्पण, कष्ट लहानपणापासून जवळून पाहिले आहे. चौथीपर्यंत साताऱ्यात शिक्षण झाले. त्यानंतर वडिलांच्या बदलीप्रमाणे विविध ठिकाणी शिक्षण झाले. वडील पोलिस अधिकारी असले तरी आम्हा भावंडांना पोलिस अधिकारी बनण्यासाठी कधीही आग्रह केला नाही. अभ्यास करा. आदर, सन्मान मिळेल अशी नोकरी करा, चांगला माणूस व्हा, एवढेच ते सांगायचे. त्यामुळे मी माझ्या करियरचा मार्ग ठरवून डॉक्टर होण्याचे ठरवले होते. बारावीनंतर आयुर्वेदाचा चार वर्षे मन लावून अभ्यास केला. खोलीवरचे मित्र झपाटून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांच्यासोबतच्या वाचनाने माझा अप्रत्यक्ष का होईना; स्पर्धा परीक्षेच्या तयारीशी संबंध येत होता. मी आयुर्वेदातच एम.डी करण्याचे ठरवले होते. मात्र, त्याच वर्षी अचानक एम. डी. च्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या. तेव्हा बराच तणावात होतो. परंतु आई-वडील सतत धीर देत होते. 

बीएएमएस पूर्ण करून मी २००९ मध्ये साताऱ्याला प्रॅक्टिस सुरू केली. त्याच दरम्यान मी अधिकारी होण्याच्या मार्गावर वळलो होतो. त्यातही पाेलिसांनी ठरवले तर सामान्यांच्या आयुष्यात कमी वेळेत किती बदल घडवू शकतात, हे जवळून अनुभवले होते. २०११ मध्ये पहिल्याच प्रयत्नात उपनिरीक्षक, २०१२ मध्ये एसटीआय झालो. परंतु उपअधीक्षकाचे स्वप्न अस्वस्थ करत होते. त्यामुळे नोकरी करून अभ्यास सुरू ठेवला आणि २०१४ मध्ये स्वप्न पूर्ण केले

आजपर्यंतची सेवा-२०१६ ते २०१८ - उपअधीक्षक, धानोरा, गडचिरोली.-२०१८ -२० - उपविभागीय अधिकारी, रायगड.-२०२० ते २३ -उपअधीक्षक, कराड.-२०२३ पासून छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त.

उल्लेखनीय कार्य-गडचिरोलीच्या पहिल्याच नियुक्ती दरम्यान एका गावात नक्षलवाद्यांकडून रात्रीतून गोळीबार सुरू झाला. आम्ही तेव्हा ठाण्यात होतो. सीआरपीएफचे जवान झुंज देत होते. आम्ही जंगलाच्या दिशेने निघालो. मध्यरात्रीतून अधिकची कुमक मागवावी लागली व पहाटेपर्यंत नक्षलवाद्यांनी पळ काढला.-पुंडलिकनगर अतिक्रमण मोहिमेत दगडफेकीनंतर काही मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणून दोन दिवसात मोहीम फत्ते केली.- कराड येथे विरोधी पक्षाच्या एका नेत्यांचे दोन मोठी आंदोलने कुशलतेने हाताळली.

गृहमंत्रालयाचे पदक:-२०१९ मध्ये गडचिरोलीतील उल्लेखनीय सेवेसाठी राज्य सरकारचे खडतर सेवा पदक.-२०२० मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आंतरिक सुरक्षा सेवा पदक प्रदान

आवडीचे छंद - वाचन, प्रवास.आवडीचे लेखक- रणजित देसाईआवडीचा खेळ - क्रिकेट व टेनिस. 

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद