शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीसाठी एक व्हा...

By admin | Published: March 10, 2016 12:31 AM

हणमंत गायकवाड , लातूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत.

हणमंत गायकवाड , लातूरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत. शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून लातुरातील कार्यकर्त्यांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला सारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक व्हावे व सामाजिक ऐक्याचा संदेश महाराष्ट्राला द्यावा, असे बौद्ध धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.बुद्ध धम्म स्थळ दर्शनासाठी अमृतराव सूर्यवंशी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, लातुरातील आंबेडकरी चळवळीला मोठ्या उंचीची परंपरा आहे. सध्या आंबेडकरी समाजाची प्रतिमा विखुरलेला समाज अशी होत आहे. बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून ही प्रतिमा बदलण्याची संधी आहे. अशा सोहळ्यांतून सामूहिक नेतृत्व विकसीत होण्यासही वाव आहे. सद्य:स्थितीत सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. ही गरज ओळखून आंबेडकरी समुहाने पुरोगामी चळवळीसमोर नवा आदर्श निर्माण करावा. यापूर्वी उचित वेळी अन्यायाचा प्रतिकार करताना लातुरातील आंबेडकरी चळवळीने आपल्या संघटनशक्तीचा परिचय करून दिलेला आहे. लातूरच्या आंबेडकरी चळवळीला परंपरा आहे. टी.एम. कांबळे, व्ही.एल. सूर्यवंशी, पप्पू गायकवाड, बब्रुवान माने, महादेव चिकटे, एम.बी. कांबळे हे चळवळीतील मोठे शिलेदार होते. त्यांची स्मृती जपत आपणही आंबेडकरी चळवळीला सामाजिक ऐक्याचा नवा आयाम देणे गरजेचे आहे. भावी काळात आंबेडकरी समाजाकडून योग्य, प्रभावी, सामाजिक, राजकीय नेतृत्व अशा सामूहिक कार्यक्रमांतून विकसीत होऊ शकते. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरावी. लातुरातील कार्यकर्त्यांनी स्वनिधीवर जयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद असून, आदर्शवत आहे. जयंती कार्यक्रमातून वैचारिक मंथन होऊन ज्ञानाच्या कक्षा अधिक वाढाव्यात. त्यासाठी तरुण, महिला, कर्मचारी व ज्येष्ठांनी या जयंती उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवावा. अन्य समाज घटकांनाही सहभागी करुन घ्यावे, असेही अमृतराव सूर्यवंशी म्हणाले.