सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील ६०४ संस्था विविध कारणांमुळे अवसायनात निघाल्या आहेत. या सर्व संस्थांना अंतीम आदेश दिले आहेत. आगादोरच ७३५ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात १४५८ सहकारी संस्था आहेत. या संस्थांची २०१५ मध्ये सहकार विभागाच्यावतीने सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणात सहकार विभागाला अनेक त्रुटी आढळल्या. यामध्ये संस्था नोंदणीकृत केलेल्या पत्त्यावर नसणे, संस्थेचे कामकाज बंद असणे, उद्देशाप्रमाणे कामकाज चालू न करणे, सहकार कायद्यातील तरतुदीचे पालन न करणे, वार्षिक सभा न घेणे, लेखा परिक्षण न करणे, कायद्यातील विहित केलेले प्रपत्रे सहकार खात्याला सादर न करणे आदींचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात ६०४ संस्था अवसायनात
By admin | Published: June 19, 2017 12:09 AM