शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

बीडमधील ‘फाईट’ ठरणार लक्षवेधी !

By admin | Published: June 12, 2014 11:38 PM

संजय तिपाले , बीड एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा बोलबाला होता़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजकीय भूकंपानंतर चित्र बऱ्याच अंशी बदलले आहे़

संजय तिपाले , बीडएकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा बोलबाला होता़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजकीय भूकंपानंतर चित्र बऱ्याच अंशी बदलले आहे़ यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे असा तिरंगी सामना रंगणार असून लढत लक्षवेधी असेल. बीड विधानसभा मतदारसंघात गतवेळी शिवसेनेचे आमदार सुनील धांडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर यांनी ७५ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता़ बीड पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका व ७० टक्के ग्रामपंचायती ही बीडमधील राष्ट्रवादीची ताकद़ जयदत्त क्षीरसागर यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांना ३ हजार ८५५ इतके मताधिक्य मिळाले़ इतर पाचही विधानसभा मतदारसंघापेक्षा बीडमधून मुंडे यांना मिळालेली लीड तुलनेने कमीच आहे़यावेळी देखील राष्ट्रवादीकडून क्षीरसागरच आखाड्यात उतरतील़ क्षीरसागरांचा सामना कोणाशी होतो? याकडे सर्वांच्या नजरा आहेत़ शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख अनिल जगताप याचे नाव चर्चेत आहे़ दुसरे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे हे देखील उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत़ शिवसेनेचे माजी आ़ सुनील धांडे हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या तंबूत गेले़त्यामुळे ते मनसेकडून रिंगणात उडी घेऊ शकतात़ मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखा फड यांचाही उमेदवारीवर दावा आहे़ दुसरीकडे शिवसंग्रामचे अध्यक्ष व आ़ विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून महायुतीला साथ दिली़ त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ते बीडची जागा मागू शकतात़ मेटे व क्षीरसागर हे राष्ट्रवादीत एकत्र होते़ मात्र, त्यांच्यात फारसे कधी पटले नाही़ आता मेटे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत़ त्यामुळे ते क्षीरसागरांना कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नाहीत़ काँग्रेसचे माजी आ़ व नारायण राणे यांचे समर्थक सुरेश नवले यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे़ मेटेंप्रमाणेच ते देखील क्षीरसागरांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत़भाजपा नेते गोपीनाथराव मुंंडे व जयदत्त क्षीरसागर यांच्या छुप्या मैत्रीची नेहमीच चर्चा होत असे;पण दुर्दैवाने आता मुंडे नाहीत़ त्यामुळे निवडणूक कोणालाही सोपी नाही़ तूर्त उमेदवारीसाठी राष्ट्रवादी वगळता इतर पक्षात जोरदार ‘लॉबिंग’ सुरु आहे़२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेराष्ट्रवादीजयदत्त क्षीरसागर१,०९१६३शिवसेनासुनील धांडे३३,२४६रिपाईसय्यद सलीम ३२,९९९इच्छुकांचे नाव पक्षजयदत्त क्षीरसागर राकाँ.अनिल जगताप शिवसेनाप्रा़ सुनील धांडे मनसेरेखा फडमनसे