शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

खाजगी डॉक्टरांच्या दातृत्वामुळे सुरक्षित मातृत्व अभियानात बीड ठरणार ‘मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:13 AM

स्त्रीभ्रूणहत्येमुळे राज्यात कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यशाकडे अग्रेसर असून, ते राज्यात एक मॉडेल ठरू पाहत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्त्रीभ्रूणहत्येमुळे राज्यात कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यशाकडे अग्रेसर असून, ते राज्यात एक मॉडेल ठरू पाहत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान अधिक गतिमान करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. गुरुवारी जिल्ह्यातील जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय या १४ अर्बन संस्थांसह ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी करून उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळेस सर्व मातांची तपासणी ही स्त्रीरोगतज्ज्ञांकडून पहिल्यांदाच करण्यात आली. पूर्वी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व इतर डॉक्टर करीत असत; परंतु आतापासून स्त्रीरोगतज्ज्ञच गर्भवतींची तपासणी करीत आहेत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हा उपक्रम राबविला जात आहे.पहिल्याच दिवशी हा उपक्रम १०० टक्के यशस्वी झाला. यापुढेही असेच कार्य सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कदम, अतिरक्त जिल्हा शल्यचिकित्सक बाह्य डॉ. सतिश हरीदास, डॉ. संजय पाटील आदी डॉक्टर, अधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत.