फुलशेवरा येथे झालेल्या ग्रामीण पेयजल योजनेतील पाणीपुरवठ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने, याच्या चौकशीसाठी सोमवारी जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील सरपंच अलका भारत कीर्तीशाही व ग्रामस्थांनी ग्रा.पं. कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे उपअभियंता आर.एस. शिंदे व शाखा अभियंता मगरे यांनी उपोषणस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नंतर कार्यकारी अभियंता वाघमारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून येथील उपोषणाची माहिती दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करून २६ जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युसुफ पटेल, माजी सरपंच कैलास निमोने व नजीर पटेल, दिनेश निमोने आदी उपस्थित होते.
आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:05 AM