शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या दुरवस्थेच्या वृत्ताची खंडपीठाने घेतली स्वत:हून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:54 PM

प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटीस; पुढील सुनावणी १४ आॅगस्टला

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची खंडपीठाने घेतली दखल

प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटीस; पुढील सुनावणी १४ आॅगस्टलाऔरंगाबाद : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण १२ प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश बुधवारी (दि.३ जुलै) दिला. याचिकेची पुढील सुनावणी १४ आॅगस्ट रोजी होणार आहे.चौपदरीकरणासाठी रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्याची झालेली दुरवस्था, वाहतुकीला होणारा अडथळा, परिणामी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या पर्यटकांची रोडावलेली संख्या आदींवर प्रकाश टाकणारे ‘जळगाव महामार्ग बनला मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारच्या (दि.३) अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.याच आशयाच्या स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीची स्वत:हून दखल घेत खंडपीठाने यापूर्वी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. ही याचिका चालविण्यासाठी न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून खंडपीठाने अ‍ॅड. चैतन्य धारूरकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी जळगाव महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून याचिका दाखल करण्याचा आदेश यापूर्वी खंडपीठाने दिला होता. त्यानुसार अ‍ॅड. धारूरकर यांनी याचिका तयार करून सदर रस्त्याचा पाहणी अहवाल, रस्त्याच्या दुरवस्थेची छायाचित्रे आणि अपेक्षित सुधारणांचे परिशिष्ट, तसेच ‘लोकमत’चा ३ जुलैचा अंक सादर केला असता खंडपीठाने केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, एमटीडीसी, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय राष्टÑीय महामार्ग आणि वाहतूक मंत्रालय, विमान पत्तन प्राधिकरण आणि नागरी उड्डयन मंत्रालय, औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कंत्राटदारासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला.अ‍ॅड. धारूरकर यांनी औरंगाबादला देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडणारी हवाई वाहतूक (जेटची) सेवा बंद झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर झालेल्या परिणामासह इतर मुद्दे सादर केले आहेत. रेल्वेद्वारे ‘दुरान्तो’सारखी ‘सुपरफास्ट’ रेल्वेने औरंगाबाद शहर देशातील मुख्य शहरांशी जोडता येईल. औरंगाबादला ‘पीटलाईन’ मंजूर करावी. कोकणाप्रमाणे मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग मंजूर करावा, सिल्लोड आणि फुलंब्री शहरालगत ‘बायपास’ किंवा उड्डाणपुल’ तयार करावा आदी सुधारणांचे परिशिष्ट अ‍ॅड. धारूरकर यांनी खंडपीठात सादर केले. केंद्र सरकारतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे आणि राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकिल अर्चना गोंधळेकर काम पाहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय