औरंगाबाद : मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी गुरुवारी (दि.२८) दिले. मात्र, नगराध्यक्षांची निवड ही याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकेची पुढील सुनावणी १८ मार्चला होणार आहे.नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.मानवतच्या नगराध्यक्षा शिवकन्या नागनाथ स्वामी (खट्याळे) यांचे जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने अवैध ठरविले होते. त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाल्याने तेथे निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या आणि अपात्र घोषित करण्याच्या आदेशाला स्वामी यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. त्यावर प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने ८ आॅगस्ट २०१८ रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यास मान्यता देऊन मतदान घेण्यास प्रतिबंध केला होता. याचिकेवर २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने मतदान घेण्यास परवानगी दिली. परंतु त्याद्वारे झालेली निवड ही याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एम. ए. गोलेगावकर, बाबूराव नागेश्वर यांच्यातर्फे अॅड. कैलास जाधव आणि निवडणूक आयोगातर्फे अॅड. शिवाजी टी. शेळके यांनी काम पाहिले.------------
मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे खंडपीठाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:30 PM
मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी गुरुवारी (दि.२८) दिले. मात्र, नगराध्यक्षांची निवड ही याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकेची पुढील सुनावणी १८ मार्चला होणार आहे. नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.
ठळक मुद्देनिवड मात्र याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन; खंडपीठाचे स्पष्टीकरण