शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
3
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
4
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
6
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
7
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
8
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
9
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
10
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
11
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
12
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
13
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
14
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
15
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
16
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
17
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
18
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
19
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
20
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

विद्यापीठाने ‘एनओसी’ नाकारलेल्या दोन बीएड महाविद्यालयांना खंडपीठाची चपराक

By विजय सरवदे | Published: September 26, 2023 4:41 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बीएड, बीपीएड व विधी या शाखांतील महाविद्यालयांना चालू शैक्षणिक वर्षात ‘एनओसी’ नाकारली.

छत्रपती संभाजीनगर : पायाभूत सुविधांचा अभाव असतानाही ‘बीएड’ अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडे नाहरकत प्रमाणपत्र मागणाऱ्या दोन संस्थांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ व बीड जिल्ह्यातील जय मल्हार संस्थेचा समावेश आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बीएड, बीपीएड व विधी या शाखांतील महाविद्यालयांना चालू शैक्षणिक वर्षात ‘एनओसी’ नाकारली. पूर्णवेळ प्राचार्य, पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या या महाविद्यालयांना चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरविण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मे महिन्यात घेतला होता. या महाविद्यालयांना राज्य शासनाच्या सीईटी सेलसाठी आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र विद्यापीठाने नाकारले. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीटीई) यांच्या मानकांप्रमाणे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शिक्षक भरती करावी, असे विद्यापीठ प्रशासनाने वारंवार बजावले होते. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय व बीड जिल्ह्यातील सोनेगाव येथील जय मल्हार सेवाभावी शिक्षण संस्थेचे केशवराज अध्यापक महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

सुनावणीनंतर न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी सदर याचिका फेटाळून लावल्या आहेत. एनसीटीईने मान्यता दिल्यानंतर विद्यापीठास ‘एनओसी’ नाकारता येत नाही, अशी या संस्थांची विनंती होती. तथापि, शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता राखण्यात विद्यापीठाने उचललेले पाऊल योग्य असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे व ॲड. संभाजी टोपे यांनी विद्यापीठाच्यावतीने, तर दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. नंदकुमार खंदारे यांनी काम पाहिले. ॲड. सचिन कुपटेकर व ॲड. एम. डी. नरवाडकर यांनी सरकारची बाजू मांडली.

टॅग्स :Educationशिक्षणDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ