शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

बायपासचे त्रांगडे सुटता सुटेना; महापालिका, बांधकाम विभाग, एनएचएआयपैकी पुढाकार कोण घेणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 5:23 PM

बीड बायपासच्या रुंदीकरणाचे, सर्व्हिस रोड विकसित करण्याचे त्रांगडे कोण सोडविणार, याबाबत कुठलीही यंत्रणा पुढाकार घेण्यास तयार नाही.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शहरातील मृत्यूचा महामार्ग म्हणून चर्चेत असलेल्या बीड बायपासच्या रुंदीकरणाचे, सर्व्हिस रोड विकसित करण्याचे त्रांगडे कोण सोडविणार, याबाबत कुठलीही यंत्रणा पुढाकार घेण्यास तयार नाही.

महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियापैकी कुठलीही संस्था तातडीने पुढाकार घेऊन काम सुरू करण्याबाबत पुढे येत नसल्यामुळे फक्त पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणावरच तो रस्ता सध्या सुरू आहे.  २३ वर्षांपूर्वी २० फुटांचा बीड बायपास विकसित करण्यात आला. सिडकोने १३ व्या योजनेसह सातारा-देवळाई विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित केले होते; परंतु सिडकोने सातारा-देवळाईकडे मोर्चा वळविला नाही, दरम्यान २००१ च्या विकास आराखड्यात यलो बेल्टमध्ये आलेल्या जागांवर झपाट्याने प्लॉटिंग होत गेली. २०१५ पर्यंत सातारा-देवळाई नवीन उपनगर म्हणून विकसित झाले; परंतु त्या तुलनेत बीड बायपासकडे इन्फ्र ास्ट्रक्चर यंत्रणांनी काहीही लक्ष दिले नाही. परिणामी तो रस्ता सध्या अपघाताचा महामार्ग म्हणून दररोज सामान्य नागरिकांचे बळी घेत आहे. 

बांधकाम विभागाने चुकविले मार्किंगबांधकाम विभागाने बीड बायपासचे मार्किंग करून चौपदरीकरण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या रस्त्याचे मध्यवर्ती मार्किंग चुकविले. त्यानुसार रस्त्याचे काम न झाल्यामुळे अनेक मालमत्ता रस्त्यात बाधित होत असल्याने काही जणांनी विरोध केला. भूसंपादन एकीकडे आणि रस्त्याचे काम दुसरीकडे, असा प्रकार त्यावेळी झाला. भूसंपादनाची अवांतर रक्कमदेखील काही मालमत्ताधारकांना बांधकाम विभागाने दिल्याचे कळते. काही ठिकाणी रस्ता रुंद आहे, तर काही ठिकाणी रस्ता अरुंद  आहे. परिणामी आता मनपाला सर्व्हिस रोड बांधणीत अनेक अडचणी येत आहेत. 

३० मीटरसह सर्व्हिस रोडच्या काढल्या होत्या निविदाबीड बायपासच्या रुंदीकरणासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने ३० मीटरसह सर्व्हिस रोड बांधणीच्या निविदा काढल्या होत्या; परंतु त्या निविदांना ब्रेक लागला. बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प, रस्ते विकास महामंडळ, एनएचएआय आणि महापालिका, असा त्या रस्त्याचा प्रवास सुरू आहे; परंतु अपघाती महामार्ग म्हणून पुढे आलेल्या त्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तातडीने कुणीही जबाबदारीने काम करण्यास तयार नाही. गायत्री इंजिनिअरिंगने साडेपाच वरून साडेसात मीटर रस्ता १९९५ मध्ये केला. त्यानंतर २००९ मध्ये रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. 

वस्तुस्थिती जाणून न घेताच घोषणाकेंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरणासाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केली; परंतु त्याचवेळी एनएचएआयने या दोन्ही रस्त्यांची वस्तुस्थिती विभागासमोर मांडली नाही.  बीड बायपास बांधकाम विभागाने बीओटीवर विकसित केला असून, त्याचा करार २०२९ पर्यंत आहे. ही बाब जून २०१८ मध्ये समोर आली. तीन वर्षे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर यंत्रणा गाफील राहिल्या. दरम्यानच्या काळात मनपाने सर्व्हिस रोडसाठी काहीही केले नाही. बांधकाम विभागाने वस्तुस्थिती समोर आणली नाही, तर एनएचएआयने प्रत्येक वेळी दिल्ली मुख्यालयाकडे बोट दाखविले. या सगळ्या बेपर्वाईत सामान्यांचे बळी बीड बायपास घेतो आहे. 

२४ तास मद्यपींचा राबता बीड बायपासवर २४ तास मद्यपींचा राबता असतो. अधिकृत, अनधिकृत हॉटेल्सचा भरणा या रस्त्यावर आहे. देवळाई चौकातून मधुबन हॉटेलकडे जाताना राँगसाईडने येणारे वाहनचालक नशेतच असतात. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले तरीही त्या रस्त्यावर सातारा-देवळाईव्यतिरिक्त शहर आणि शहराबाहेरून येणारी वाहतूक मोठी आहे, त्यामुळे दुचाकीस्वारांना भयमुक्त वाहन चालविणे अवघड झालेले आहे. काय असू शकतात उपाय 

महापालिकेने तातडीने स्वत:च्या हद्दीपुरता सर्व्हिस रोड विकसित करणे. बांधकाम विभागाकडून एनएचएआयने तो रस्ता हस्तांतरित करून घेणे. बीओटी करारात शासनाने तातडीने लक्ष घालून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तरतूद केलेला १२५ कोटींचा निधी बायपासच्या कामासाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करणे. रस्त्यावर प्रत्येक १ ते दीड कि़मी.वर डांबरी गतिरोधक टाकणे. रस्त्यांवरून वाहणाऱ्या वाहनांची गती त्यामुळे कमी होईल. सिग्नलवरून डावीकडे जाण्यासाठीचा मार्ग अतिक्रमणमुक्त करून तेथे तातडीने डांबरी रस्ता विकसित करणे, त्यामुळे सिग्नलवरील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार होणार नाहीत. मनपाने १५० कोटींतून किमान एखादा उड्डाणपूल त्या परिसरात स्वत: बांधावा किंवा अंतर्गत वसाहतींतून बाहेर येणाऱ्या रस्त्यांसाठी बीड बायपासलगत स्वतंत्र सर्व्हिस रोड महिनाभरात विकसित करावा. 

६ कि़मी.मध्ये १२ ठिकाणांहून येते वाहतूकबीड बायपास महानुभाव आश्रमाकडून सुरू होतो. उजवीकडून नाईकनगरमध्ये जाताना सहा कि़मी.च्या अंतरात सुमारे १२ नागरी वसाहतींतील वाहने व नागरिकांना बीड बायपासवरून दैनंदिनीसाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे ‘राँगसाईड’ने जाण्याशिवाय नागरिकांना पर्याय उरलेला नाही. महानुभाव आश्रम, कमलनयन बजाज हॉस्पिटल, एमआयअी कॉलेज, आमदार रोडकडे, रेणुकामाता मंदिर कमान, आयप्पा मंदिरकडे, देवळाई चौक, दत्त मंदिरालगतचा रस्ता, अरुणोदय कॉलनी, सूर्या लॉनलगतचा रस्ता, नाईकनगरकडे जाणारा रस्ता. ही सगळी १२ ठिकाणे उजव्या बाजूने आहेत आणि या १२ मार्गांवरून सातारा-देवळाई परिसरातील ५० हजार लोकसंख्या बीड बायपास ते शहर असा रोजचा भयावह प्रवास करीत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका