शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

'तिच्यासोबत राहण्यापेक्षा जेलमध्ये बरे'; बायकोशी भांडणानंतर विमानतळ उडविण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 1:24 PM

नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे धावपळ, रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडले

छत्रपती संभाजीनगर : मांगीरबाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या व परवा विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करीत होते, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ११:०८ वाजता आला. या फोनमुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. एमआयडीसी सिडको पोलिसांसह बीडीडीएस, एटीएसच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे स्पष्ट झाले. फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याने बायकोसाेबत भांडण झाल्यामुळे असा फोन केल्यास पोलिस अटक करतील म्हणून चुकीची माहिती देणारा फोन केल्याचे सांगितले.

या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी १०० नंबरवर खोटी माहिती देणारा कारभारी कडुबा रिठे (४१, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) याच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कारभारी रिठे याने बुधवारी रात्री ११:०८ वाजता १०० नंबरवर फोन करून उद्या व परवा विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. ही चर्चा आपण मांगीरबाबाच्या जत्रेला जाताना गाडीत ऐकल्याचेही त्याने स्पष्ट केले. तेव्हा नियंत्रण कक्षाने तत्काळ बीडीडीएस निरीक्षक सुशील जुमडे यांच्या पथकास कळविले. त्यानुसार बीडीडीएसचे निरीक्षक जुमडे, सहायक उपनिरीक्षक अजमत शेख, हवालदार नवनाथ शेळके, चेतन चव्हाण, सुनील काळे यांच्यासह डॉग हॅण्डलर प्रसाद लोखंडे हे चार्ली डॉगला घेऊन विमानतळावर पोहोचले. विमानतळाचा परिसर त्यांनी तपासला, मात्र काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्याचवेळी दहशतवाद विरोधी पथकानेही विमानतळावर धाव घेतली. सहायक उपनिरीक्षक दशरथ जाधव यांच्या तक्रारीवरून कारभारी रिठे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

असे केल्यास तरी जेलमध्ये जाईलआरोपी कारभारी रिठे हा रिक्षाचालक आहे. त्याचे बायकोसोबत इतरांना वस्तू देण्यावरून वाद झाले होते. तुझ्यासोबत राहण्यापेक्षा जेलात गेलेले बरे म्हणून त्याने १०० नंबरवर चुकीची माहिती देण्यासाठी फोन केला. चुकीची माहिती दिल्यानंतर पोलिस गुन्हा दाखल करून जेलात टाकतील, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडले नाही. कारभारी याचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद