शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

दुष्काळाच्या नावाने चांगभलं! मराठवाड्यात अतिवृष्टीच्या काळातही टँकरचा मारा, करोडो खर्च

By विकास राऊत | Published: November 16, 2022 4:03 PM

मराठवाड्यात टँकर घोटाळ्याचा शोध सुरू, गेल्या चार वर्षांत हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडूनही टँकरद्वारे पुरविले पाणी

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या नावाने टँकर लॉबीचे चांगभलं झाल्याची चर्चा वारंवार होते. मागील चार वर्षांत विभागात पर्जन्यमान सरासरी १ हजार मिलीमीटरच्या पुढे गेले असतानाही या काळात टँकरने पाणीपुरवठ्यावर विभागात कोट्यवधींचा खर्च झाला आहे. यात २०१८ ते २०२२ या काळात अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम टँकरद्वारे पाणी पुरविण्यावर खर्च झाल्याचा संशय आहे. याबाबत विधानसभा अधिवेशनात बीडमधील लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सुमारे ४०० अधिकाऱ्यांची तालुकानिहाय माहिती संकलनासाठी नियुक्ती केली आहे. लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, महसूल कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी गटविकास अधिकारी कार्यालयात जाऊन टँकर कसे लावले, सुरू कधी केले, किती फेऱ्या झाल्या, याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करणार आहेत.

मराठवाड्यात १० वर्षांत शहरी व ग्रामीण भागातील १० पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा खर्च टँकर लॉबीला दिला आहे. दुष्काळाची इष्टापत्ती करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यापलीकडे दुसरी कुठलाही उपाय प्रशासकीय पातळीवर करण्यात आला नाही. परिणामी मराठवाड्यातील ८ हजार ५५० पैकी बहुतांश गावे आजही टंचाई सामना करीत आहेत. एकीकडे टँकरलॉबी पाच वर्षांत गब्बर झाली, तर दुसरीकडे पाच वर्षांत जाेरदार पाऊस होऊनही मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांचा आकडा कमी का होत नाही ? असा प्रश्न आहे. २०१५-१७ या दोन वर्षांत लातूरमध्ये थेट रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. टँकरच्या खर्चाव्यतिरिक्त जलयुक्त शिवार योजनेतही मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. असे असताना मराठवाड्याला पिण्याचे पाणी कायमस्वरुपी मिळावे, यासाठी काहीही नियोजन होताना दिसून येत नाही.

दशकभरात ८०० कोटींचा खर्चमागील दहा वर्षांत ८०० कोटींचा खर्च टँकरने पाणीपुरवठा करण्यावर झाला आहे. २०१३ ते २०१७ या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यावर तब्बल ४०१ कोटींच्या आसपास रक्कम खर्च करण्यात आली. ९ हजार २६५ टँकरने मराठवाड्यातील सुमारे १ कोटी जनतेला पाणी पुरविल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. त्यापुढे २०१८ पासून २०२२ पर्यंतच्या काळात ४ हजार ८०१ टँकरवर अंदाजे ३९९ कोटींचा खर्च करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशी फक्त याच काळातील होणार आहे.

२०१९ पासून पाऊस जास्त२०१९ पासून विभागाच्या सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होतो आहे. या चारही पावसाळ्यात १ हजार मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भूजल पातळीचे प्रमाणदेखील वाढले आहे. असे असताना टँकरने ग्रामीण भागात पाणी द्यावे लागले, हे विशेष.

वर्ष...........टँकर........अंदाजे खर्च२०१३........२१३६........७८२०१४........१४४४........४४२०१५........४०१५........२२९२०१६........ ९४०.........२५२०१७........२१८.........१०२०१८........९७३.........४५२०१९........३,४०२......२१०२०२०........३३२.........११७२०२२........९४...........४२एकूण.......१३,५५४....८००(खर्च कोटी रुपयांत)

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊस