शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सावधान, मोबाईलवर व्हिडीओ दाखविण्याचे आमिष देत अल्पवयीन मुलावर भाडेकरूचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 12:35 PM

आजी वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी घराच्या गच्चीवर गेली होती, तेव्हा नातवाच्या चपला भाडेकरूच्या रूम बाहेर दिसल्याने आल संशय

वाळूज महानगर : वाळूज परिसरातील एका १३ वर्षीय मुलाला घरी बोलावून आधी मोबाईलवर व्हिडीओ दाखवले नंतर धाक दाखवून त्याच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या भाडेकरूविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी बापू सोनवणे (रा. वाळूज परिसर) यास जेरबंद करण्यात आले आहे.

लासुर स्टेशन परिसरातील पप्पू (१३, नाव बदलले आहे.) हा शाळेला उन्हाळी सुटी लागल्याने १० वर्षांच्या लहान बहिणीसोबत आठवडाभरापूर्वी आजोळी वाळूज परिसरात आला होता. दरम्यान, बुधवार (दि. १) दुपारी २ वाजेच्या सुमारास पप्पू याची आजी वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी घराच्या गच्चीवर गेली होती. गच्चीवरून खाली उतरत असताना आजीला पप्पूच्या चपला भाडेकरू बापू सोनवणे याच्या रूमसमोर दिसून आल्या. यानंतर आजीने नातवाला जोरजोरात हाका मारल्या. मात्र, आतून प्रतिसाद येत नसल्याने आजीचा आवाज ऐकून दुसऱ्या भाडेकरूने दरवाजा लोटून घरात प्रवेश केला. यावेळी घरात बापू सोनवणे हा अर्धनग्न अवस्थेत, तर पांघरुणाखाली कुणीतरी झोपलेले दिसून आले. 

यानंतर आजी व दुसऱ्या भाडेकरूने पांघरूण ओढले तेव्हा त्यांना पप्पू हा भेदरलेल्या अवस्थेत दिसला. त्याला बोलता येत नसल्याने त्याला जवळ घेऊन शांत केले. यानंतर आजी व दुसऱ्या भाडेकरूने बापू सोनवणे यास जाब विचारला असता त्याने मी काहीच केले नाही, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आजीने नातू पप्पू यास घरी घेऊन गेल्यानंतर काही वेळाने त्याच्याकडे चौकशी केली. 

तेव्हा पप्पूने आपण मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी बापू सोनवणे याच्या घरी गेल्याचे सांगत चित्रपट संपल्यानंतर घरात झोपी गेल्याचे सांगितले. यानंतर काही वेळाने बापू सोनवणे याने घरात झोपलेल्या पप्पू याला मारण्याचा धाक दाखवून अश्लील कृत्य केल्याचे सांगितले. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पप्पूच्या आजीने वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनंतर सायंकाळी आरोपी बापू सोनवणे यास वाळूज पोलिसांनी जेरबंद करून त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी