लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना बुधवारपासून जागेवरच दंड आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. दंड आकारणीसाठी झोननिहाय पथकेही तयार केली आहेत. इंदूर महापालिकेने नागरिकांना जशी शिस्त लावली, तशीच पावले मनपा उचलणार असल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख नंदकुमार भोंबे यांनी दिली.मागील काही दिवसांमध्ये महापालिकेने शहरात ठिकठिकाणी साचणारा कचरा शंभर टक्के उचलला आहे. हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रांवर दररोज कचरा नेण्यात येत आहे. तेथे कचºयावर प्रक्रियासुद्धा केली जात आहे. कचºयाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी झोननिहाय मशीन बसविणे, मुख्य कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी कामांच्या निविदाही अंतिम टप्प्यात आहेत. महापालिका सर्वच कचराकुंड्या हटवीत आहे. नागरिकांनी दररोज सकाळी कचरा घंटागाडीतच टाकावा म्हणून आग्रह धरण्यात येत आहे. ओला व सुका कचरा नागरिकांनी वेगळा करून दिल्यास त्यावर प्रक्रिया करणे सोपे आहे. एकत्रित कचरा वेगळा करणे मनपाला अशक्य आहे. नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी इंदूर पॅटर्ननुसार जागेवरच दंड आकारण्यासाठी ११ जुलैच्या सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव दिला. सर्वसाधारण सभेनेही दंड आकारणीच्या दराला मंजुरी दिली.असा आहे दंडरस्त्यावर कचरा टाकल्यास१५० रुपयेहॉटेल, दुकाने, व्यावसायिकांना५०० रुपयेजास्त कचरा निर्माण करणाºयांना५,००० रुपयेसार्वजनिक ठिकाणी थुंकणे१०० रुपयेउघड्यावर लघुशंका करणे१०० रुपयेउघड्यावर शौच करणे५०० रुपयेखाजगी कंत्राटदार नेमणारशहरातील प्रत्येक घरातून कचरा संकलनासाठी खाजगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मनपाने निविदा प्रक्रियाही सुरू केलेली आहे. लवकरच कचरा संकलन कंत्राटदाराकडे सोपविण्यात येणार आहे. इंदूर महापालिका एका मालमत्ताधारकाकडून दोन रुपये वसूल करीत आहे. औरंगाबाद मनपा कंत्राटदार नेमल्यावर एक रुपया शुल्क दररोजप्रमाणे घेणार आहे.
खबरदार! रस्त्यावर कचरा टाकाल तर... जागेवरच दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:09 AM