शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

भाई, दादांनी दोन वर्षांत केले पाच खून; अवैध धंदे, नशेखोरांमुळे पुंडलिकनगर परिसरात अशांतता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 12:02 PM

Crime News Aurangabad प्राणघातक हल्ला करणे, दगडफेक करणे, सामान्यांना अडवून लुटमार करण्यासोबतच हे नशेखोर तरुण रात्रभर चौकाचौकात बसून टवाळक्या करतात.

ठळक मुद्देपोलिसांनीच दुर्लक्ष केले व पुन्हा भाई, दादांनी डोके वर काढले.

- बापू सोळुंके औरंगाबाद : पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाई, दादांची दिवसेंदिवस दहशत वाढते आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याने या भाई, दादांनी दोन वर्षांत पुंडलिकनगर, हनुमानगर, गारखेडा परिसरात तब्बल पाच खून ( Murder) केले आहेत. (five murders in two years in Pundalikanagar of Aurangabad ) 

पुंडलिकनगर, हनुमाननगर, गजानननगर, हुसेन कॉलनी, भारतनगर, गारखेडा परिसर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर, भारतनगर, आनंदनगर, रेल्वे रूळ परिसरातील कष्टकऱ्यांच्या वसाहतीत अवैध दारू विक्रीचे अड्डे रात्रंदिवस सुरू असतात. दारूसोबतच नशेच्या गोळ्या, व्हाइटनर, गांजाची नशा करणाऱ्या तरुणांची गुंडगिरी वाढली आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी येथे रुजू झाल्यानंतर पुंडलिकनगरात नागरिक स्नेहसंमेलन घेतले होते. यात नागरिकांनी अवैध धंदे आणि नशेखोर तरुणांमुळे परिसरात अशांतता पसरल्याचे सांगितले होते. यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी दोन चार कारवाया केल्या. या क्षुल्लक कारवायांचाही काही दिवस समाजकंटकांना जरब बसला होता. मात्र, नंतर पोलिसांनीच दुर्लक्ष केले व पुन्हा भाई, दादांनी डोके वर काढले. या भाई, दादांनी दोन वर्षांत पाच खून केले. 

प्राणघातक हल्ला करणे, दगडफेक करणे, सामान्यांना अडवून लुटमार करण्यासोबतच हे नशेखोर तरुण रात्रभर चौकाचौकात बसून टवाळक्या करतात. वाहनातील पेट्रोल चोरणे, चोरी, घरफोडी आदी गुन्हे ते करतात. आकाश राजपूत या तरुणाची रविवारी रात्री भरचौकात शेकडो नागरिकांसमोर हत्या करण्याचे धाडस या गुंडाच्या टोळीने केले. या टोळीची प्रचंड दहशत असल्याने जखमी आकाश ‘वाचवा, वाचवा’ म्हणून मदत मागत असताना कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. अन्य काही भाई, दादांच्या टोळ्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त आहेत.

दोन वर्षांत झालेल्या खुनाच्या घटना :१) शिवजयंती मिरवणुकीत पुंडलिकनगर रोडवर तरुणाचा चाकूने भोसकून खून.२) किरकोळ कारणावरून बेबी राऊत मायलेक आणि जावयाने शिंदे नावाच्या तरुणाचा भोसकून खून केला.३) न्यायनगरात एका जणाचा खून.४) विजयनगरात एकाचा खून.५) हनुमाननगरात परवा झालेला तरुणाचा खून.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस