शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

By प्रशांत तेलवाडकर | Published: June 27, 2024 7:18 PM

रविवारी रस्ते अडविणाऱ्या विक्रेते, हातगाडी व रिक्षावाल्यांवर कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहानूरमियाँ दर्गा चौक लगतच्या श्रीहरी पॅव्हेलियनच्या जागेवर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभरात मोठी उलाढाल होत असली तरी नागरिकांसाठी हा बाजार गैरसोयीचा बनला आहे. मनपाने लाखो रुपये खर्च करून येथे बांधलेली भाजीमंडई अक्षरश: कचरा डेपो बनली व भाजी विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावरच बस्तान मांडणे सुरू केले. यामुळे सतत वाहतूक जाम होत आहे. वाहतूक पोलिस व मनपाचे हे अपयश आहे, अशी संतप्त भावना या परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.

८ वर्षांपासून भाजीमंडई ओसाडश्रीहरी पॅव्हेलियनच्या बाजूला २०१५ मध्ये भाजीमंडई उभारली. यात प्रत्येक रांगेत ५ गाळे असे ४० गाळे बांधण्यात आले. यात मोठा ओटा, वरती पत्र्याचे शेड व ओट्याखाली सामान ठेवण्यासाठीची छोटी खोली, असे चांगले डिझाइन तयार करण्यात आले. मात्र, येथे भाडे लागते म्हणून विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजी विक्री करणे सुरू केले. यामुळे या बांधलेल्या मंडीकडे दुर्लक्ष झाले. आज तिथे कचरा डेपो बनला आहे. कुजलला भाजीपाला, दारूच्या बाटल्या, गाद्या, चटाई, प्लास्टिक येथे पडलेले असून तिथेच घाण केली जात आहे. यामुळे बांधकामासाठी आलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहे.

रस्त्यावर बस्तान, वाहतुकीला अडथळाश्रीहरी पॅव्हेलियन समोरील रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने नाल्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकून रस्ता रुंद करण्यात आला. येथील नाला छोटा झाला व रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान थाटणे सुरू केले. पार्किंग, त्यापुढे भाजी विक्रेते, हातगाडीवाले, त्यापुढे रिक्षावाले आणि उरलेल्या छोट्या जागेतून वाहने ये-जा करतात. यामुळे रविवारी सतत वाहतूक जाम होत असते.

विक्रेत्यांना बसवा भाजीमंडईतलाखो रुपये खर्च करून बांधलेल्या भाजीमंडईची संपूर्ण स्वच्छता करावी, दुरुस्ती करावी, तिथे लाइटाची व्यवस्था करावी. नंतर तिथे रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्तीने बसवावे. जे विक्रेते रस्त्यावर बसतील, वाहतुकीला अडथळा आणतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न