शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

भास्करराव पेरे पाटलांचा नादच खुळा, अशी केली गावकऱ्यांची दिवाळी गोड 

By महेश गलांडे | Published: November 13, 2020 2:32 PM

औरंगाबाद शहरापासून पंधरा-वीस किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद शहरापासून पंधरा-वीस किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे.

औरंगाबाद - सोशल मीडियावर पाटोदाचे सरपंच पेरे पाटील यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आपल्या नियोजनबद्ध आणि प्रामाणिक कामातून त्यांनी पाटोदा गावाला वेगळी ओळख निर्माण करुन दिलीय. आता, दिवाळीच्या तोंडावरही गावकऱ्यांसाठी चांगला उपक्रम राबवत ग्रामपंचायतीने गावकऱ्यांची दिवाळी गोड केलीय. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर  20 रुपयांनी देण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 25 किलो एवढी वाटप करण्यात आली. 

औरंगाबाद शहरापासून पंधरा-वीस किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. तीन हजार 350 लोकसंख्या असलेल्या गावानं राज्यात आदर्श घालून दिले आहेत. आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या औरंगाबादजवळील पाटोदा ग्रामपंचायतीने गावातील 750 कुटुंबीयांना अर्ध्या किमतीत म्हणजेच 20 रुपये किलोप्रमाणे प्रतिकुटुंब 25 किलो साखर वाटून ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. 

सध्या बाजारात 40 रुपये किलोप्रमाणे मिळणारी साखर पेरे यांनी लातूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून 28 रुपये किलोप्रमाणे 100 क्विंटल विकत घेतली. यासाठी ग्रामपंचायतीला 3 लाख रुपयांचा खर्च करावा लागला. कारखान्याकडून साखर घेतल्यानंतर वाहतूक खर्च धरून ग्रामपंचायतीला 30 रुपये किलोप्रमाणे साखर मिळाली. जमा झालेल्या कराच्या रकमेतून प्रतिकिलोमागे 10 रुपयांची भरपाई करत ही साखर ग्रामस्थांना वाटण्यात आली. याबाबत बोलताना ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले की, कोरोनामुळे गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दिवाळीसारखा सण गोड व्हावा, या उद्देशाने साखरवाटपाचा उपक्रम राबवला. यासाठी प्रशासक कमल मगरे, माजी सरपंच भास्कर पाटील पेरे, माजी उपसरपंच विष्णू राऊत यांनी परिश्रम घेतले.

भास्कर पेरे पाटील यांचे व्हिडिओही सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत असतात. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते गावचा कारभार कसा चालतो, गावाने कशारीतीने कामकाज केलंय, याबद्दलही माहिती देत असतात. त्यामुळे, सरपंच पेरे पाटील यांच्या पाटोदा गावाला आवर्जून पाहण्यासाठी लोकं जातात. तरुणाई या गावचा आणि सरपंचाचा आदर्शही इतरांना सांगतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2022sarpanchसरपंचSugar factoryसाखर कारखाने