राजेश खराडे , बीडकधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्याचे यंदा भावही गडगडले आणि अत्यल्प पावसामुळे क्षेत्रही कमालीचे कमी झाले आहे. गतवर्षी सर्वाधिक उत्पादनाची नोंद असलेल्या आष्टीत शून्य टक्के नोंद आहे. यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने आगामी काळात कांदा दर वधारून ग्राहकांच्या डोळ्याला पाणी येणार असल्याचे संकेत कृषि उपसंचालक बी़ एम़ गायकवाड यांनी दिले आहे.जिल्ह्यात कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र आठ हजार हेक्टरवर आहे. यामध्ये खरीप हंगामात २ हजार ४३४ हेक्टर, रबी हंगामात ४ हजार ८६९ हेक्टर तर उन्हाळ्यात कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र ८११ हेक्टरवर आहे. गेल्या तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी होत असल्याने व कांद्याला चांगली बाजारपेठ नसल्याने लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गतवर्षी १०० टक्के पाऊस झाल्याने कांदा लागवडीचे क्षेत्रही वाढले होते. सरासरी आठ हजार क्षेत्रापैकी सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली होती. त्यानुसार उत्पादनातही वाढ झाली होती. कांद्याला ४० ते ५० रु प्रती किलो दर मिळाल्याने कांद्याने शेतकऱ्यांना साथ दिली होती. जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक लागवड ही आष्टी तालुक्यात करण्यात आली होती. यंदा पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांवर आल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांवरच अधिकचा भर दिला आहे. जिल्हाभरात अद्यापपर्यंत केवळ १ हजार १४४ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. कांद्याचे दरही १५ ते २० रुपयांवर आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बीड तालुक्यातून ५१३ हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे.दरम्यान, भाव नसल्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही पुरती निराशा झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़आतापर्यंत सर्वात कमी क्षेत्रगेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याच्या उत्पादनाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. यंदा आतापर्यंत सर्वात कमी ११४४ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे़तंत्राधिकाऱ्यांकडे माहितीच नाहीदुष्काळजन्य परिस्थिती आहे. बळीराजा अडचणीत आला असतानाही येथील तंत्राधिकारी एस.जी.बिरजदार यांना त्याचे काही घेणे-देणे नाही. तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे अहवाल नसल्यानेच माहिती देण्याचे टाळले.
भावही गडगडले अन् क्षेत्रही घटले़़़!
By admin | Published: November 25, 2014 12:19 AM