शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

भीमा-कोरेगावच्या घटनेचे औरंगाबाद शहरात पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:45 AM

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे सोमवारी दुपारपासून शहरात तीव्र पडसाद उमटले. शहराच्या विविध भागांत दलित समाजातील संतप्त कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायला लावली. काही भागांत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. तीन एसटी बसेसवर दगडफेक झाली. दुपारपासून सुरु झालेला हा तणाव रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे सोमवारी दुपारपासून शहरात तीव्र पडसाद उमटले. शहराच्या विविध भागांत दलित समाजातील संतप्त कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायला लावली. काही भागांत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. तीन एसटी बसेसवर दगडफेक झाली. दुपारपासून सुरु झालेला हा तणाव रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होता. या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाची मदत घेत शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. रात्रीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.भीमा कोरेगावच्या घटनेची माहिती कळताच सुरुवातीला उस्मानपुरा आणि क्रांती चौक भागात दलित समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यामुळे कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याचवेळी उस्मानपुरा रोडवरील एका शोरुमवर दगड भिरकावल्याने शोरुमच्या प्रवेशद्वाराची काच फुटली. यानंतर हा जमाव उस्मानपुºयाकडे गेला. कार्यकर्त्यांनी उस्मानपुरा ते पीरबाजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. याचेवळी त्रिमुर्ती चौकातही कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहरातील घटनांची माहिती वेगाने पसरल्याने त्यानंतर मुकुंदवाडी, रामनगर, पैठणगेट रोड आदी भागांत व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली.जय भवानीनगर भागातही कार्र्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याठिकाणी एका एटीएमवर दगडफेक झाली.टी.व्ही. सेंटर येथे सुमारे हजार लोकांचा जमाव रस्त्यावर आला. यावेळी तेथील होर्डिंग जमावाने पाडून टाकले. यानंतर जमाव भाजी मार्केटमध्ये घुसला. तेथील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या उलट्या करून पुढे गेला. यामुळे लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. नक्षत्रवाडी, कांचनवाडी येथील दुकानांच्या काचा फोडण्यात आल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. मुकुंदवाडी, रामनगर येथील एका हॉस्पिटलवर दगडफेक करण्यात आली. सायंकाळपर्यंत या भागातील व्यवहार पूर्णपणी थंडावले.सायंकाळच्या वेळी कॅनॉट मार्केटमध्येही दुकाने (पान २ वर)१५ बसेस फोडल्याऔरंगाबादसह विविध ठिकाणी सोमवारी एसटी महामंडळाच्या १५ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या. आमखास मैदानाजवळ जळगाव - वैजापूर बसच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये वाहकाला मार लागला. टाऊन हॉल येथे तीन बसच्या तर हर्सूल येथे दोन बसच्या काचा फोडण्याचे प्रकार झाले. याबरोबरच क्रांतीचौक, अंबेलोहळ, सिल्लोड, डोंगरगाव फाटा याठिकाणी बसेसच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या. रात्री उशिरा कांचनवाडी येथे दोन मालवाहतूक ट्रक फोडले..अफवांवर विश्वास ठेवू नका -ढाकणेनागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले. शहराचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, एसआरपीएफची एक तुकडी शहरात तैनात करण्यात आली. सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहे.आंबेडकरी जनतेने संयम बाळगावाभीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी समाजावर झालेल्या दगडफेकीची घटना ही निषेधार्ह आहे. भीमा-कोरेगावपासून अहमदनगरपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी गाड्यांवर दगडफेक व जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. या घटनेचा रिपाइंच्या वतीने निषेध करतो. या घटनेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातही पडसाद उमटले. आंबेडकरी समाजाने संयम बाळगावा. शांततेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेने या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी केले आहे.भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रा. अविनाश डोळस यांनी आंबेडकरी जनतेने संयम बाळगून या घटनेचा शांततेने निषेध करावा, असे आवाहन केले.माजी मंत्री गंगाधर गाडे यांनीही पीरबाजार परिसरात कार्यकर्त्यांसमोर बोलताना शांततेचे आवाहन केले.यासंदर्भात रमेशभाई खंडागळे, रिपाइंचे नेते दौलतदादा खरात, शहराध्यक्ष किशोर थोरात, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ आदींनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.