औरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले.पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास सिल्लोकडून आलेल्या मलकापूर -औरंगाबाद मशीद परिसरात दोन आणि शिवाजीनगर येथे एक अशा तीन एस.टी.बसवर दगडफेक करण्यात आली. शिवाय उस्मानपुरा रोडवरील एक शो रूमवर जमावाने दगड भिरकावल्याने शोरूमच्या प्रवेदशदाराची काच फुटली. यानंतर हा जमावाने क्रांतीचौक, उस्मानपुरा ते पीर बजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. टी.व्ही.सेंटर, येथे सुमारे हजार लोकांचा जमावर रस्त्यावर आला. यावेळी तेथील होर्डिंग जमावाने पाडून टाकले. यानंतर जमाव भाजी मार्केटमध्ये घुसला. तेथील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या उलट्या करून पुढे गेला. यामुळे लहान-मोठे दुकानदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. जयभवानीनगर येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर दगडफेक करून प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या.
त्रिमूर्ती चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, येथील दुकानाच्या काचा फोडण्यात आल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. मुकुंदवाडी,रामनगर येथील लाईफ केअर हॉस्पिटलवर दगडफेक, कॅनाट मार्केटमध्येही दुकाने बंद करायला लावल्याने शहरात तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर,गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे,पोलीस निरीक्षक श्रीकांत परोपकारी,पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे , पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि राज्य राखीव दलाचे जवानांनी नागरीकांना शांत राहण्याचे आवाहन केले. शहरात निव्वळ अफवां सुरू होत्या. कोणी वाहने पेटविल्याची अफवा पसरवित होते तर काही जण दुकाने फोडल्याची चर्चा करीत होते. नागरीकांनी अफवावर विश्वास ठेवू नये,शांतता राखावी,असे आवाहन पोलीस उपायुक्त ढाकणे यांनी केले.