स्पर्धेत व्हिडिओ गटात सहभागी राज्यभरातून एकमेव जिल्हा परिषद शाळा ही भिसेवाडी येथील होती. येथील विद्यार्थी व शिक्षकांनी ही शॉर्टफिल्म बनविली होती. पुरस्कार विजेत्यांना औरंगाबादेतील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले. भिसेवाडी शाळेचे शिक्षक मच्छिंद्र बडोगे, शेख फेरोज शहानूर यांच्यासह विद्यार्थ्यांचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, कमांडर ब्रि. उपिन्दर सिंग आनंद, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नवेली देशमुख, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर आदी मान्यवरांनी सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम बक्षीस देऊन सत्कार केला. कोविडसंदर्भात नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. भिसेवाडी शाळेला मिळालेल्या पुरस्कारामुळे जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो : राज्यातून भिसेवाडी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी बनविलेल्या चला करू मतदान या शॉर्टफिल्मला द्वितीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना शाळेतील शिक्षक उपस्थित होेते.
310121\img_20210131_170545_1.jpg