पैठण : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजु भुमरे यांची तर उपसभापतीपदी कुसुम बोंबले यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी समितीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी एफ बी बहुरे, सहा. निवडणुक अधिकारी श्रीराम सोन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.सभापती व उपसभापती पदासाठी अनुक्रमे भुमरे व बोंबले यांचेच उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेत दाखल झाल्याने निवडणुक अधिकारी यांनी भुमरे व बोंबले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच कृ.उ.बा. समितीसमोर जमा झालेल्या शिवसैनिकांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचा आ. संदिपान भुमरे, दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, एकनाथचे संचालक अप्पासाहेब पाटील, प्रल्हाद औटे, तालुकाप्रमुख अण्णा लबडे, संभाजी सव्वासे, नामदेव खराद, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, दादा बारे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक कारभारी लोहकरे, केदार शिंदे, कैलास कळसकर, माणिकराव खराद, अंबादास गवारे, सुरेश दुबाले, विजय हजारे, सुनंदा भाऊसाहेब मोगल, राजेंद्र दगडू किसे, योगेश सोलाटे, भाऊसाहेब लबडे, महाविर काला, महेश मुंदडा, विलास भूमरे आदींची उपस्थिती होती.
पैठण बाजार समिती सभापतीपदी भुमरे
By admin | Published: September 21, 2016 12:05 AM