शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
4
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
5
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
6
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार
7
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
8
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
10
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
11
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
12
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
13
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
14
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
15
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
16
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
17
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
18
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
19
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
20
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी

राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 3:16 PM

दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले...

महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीच्या या धामधुमीतच दिवाळीही आली आहे. दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले.

"माझ्या लहाणपणी काही ठरावीक प्रकारचेच फटाके होते. आता काळ बदलला आहे. आता विविध प्रकारचे फटाके बाजारात येत आहेत. यावेळी त्यांनी लवंगी फटाक्याने हात भाजल्याची आठवणीही सांगितली. तसेच, आम्ही राजकारणातही अनेक फटाके फोडले आहेत. कुणाच्या बुडाखालीही लावले आहेत. पण एक आहे, आम्ही कधी मर्यादा सोडली नही. फटाका तर नक्की फोडायचा मात्र तो फारसा हानीकारक नसावा, असे आमचे मत असते," असे शिरसाट म्हणाले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

यावेळी त्यांना, काही नेत्यांची नावं घेत, संबंधित नेत्यासाठी कोणता फटाका खरेदी कराला? असे विचारले असता, त्यांनी वर्णन करत फटाक्यांची नावं सांगितली. यात, संजय राउतांसाठी फटाका खरेदी करायचा असे तर कोणता फटाका खरेदी कराल? असे विचरले असता, शिरसाट म्हणाले, तो फटाका नाहीये, ते 'भुई चक्कर' आहे. स्वतःपुरते गोल गोल फिरणे. स्वतःची प्रसिद्धी करणे. यासाठी त्यांना हे भूई चक्कर परफेक्ट बसते. म्हणून त्यांना याचे प्रेझेंट द्यायला हवे.

आदित्य ठाकरेंसाठी सुरसुरी तर सुषमा अंधारेंसाठी... -यानंतर आदित्य ठाकरेंसाठी कोणता फटाका खरेदी कराल असे विचारले असता शिरसाट म्हणाले, 'सुरसुरी' शिवाय दुसरा नाही. कारण त्याला इजा होऊ नये. हेच त्याच्यासाठी परफेक्ट आहे. सुषमा अंधारेंसंदर्भात बोलताना ते म्हणाले, त्यांच्यासाठी 'सापाची गोळी' घ्यायला हवी. जागच्या जागी फणा मारणार आणि शांत. याशिवाय उद्धव ठाकरेंसाठी 'अनार'. एका ठिकाणी ठेवा, ते वर जातात, दोन मिनिटांसाठी लख्ख प्रकाश होतो आणि पुन्हा शांत बसतात. ते टोमणे जसे मारतात ना, तसा अनार, हा कुणाला त्रास देत नाही, गेगीच वर जातो आणि शांत होतो. 

मुख्यमंत्री शिंदेंसाठी सुतळी बॉम्ब तर फडणवीसांसाठी... -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री हे सुतळी बॉम्ब सारके आहेत. एक तर त्याला फोडायला हिंमत लागते, दिसतो छोटा पण वाजा मोठा होतो, तो क्रांती घडते. म्हणून त्यांच्यासाठी सुतळी बॉम्ब परफेक्ट आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सध्या रिव्हॉल्वरच्या भूमिकेत आहेत. त्यांना ऐतिहासिक रिव्हॉल्वर द्यायला हवी, असे शिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरेDiwaliदिवाळी 2024Shiv SenaशिवसेनाSushma Andhareसुषमा अंधारे