ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत विकासकामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यातून गंगापूर तालुक्यातील लांझी गावांतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. पिंपरखेडा येथील मारोती मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर लिंबेजळगाव येथे सिमेंट रस्ता तयार करण्यात येईल व शेंदूरवादा येथे सिमेंट रस्ता होणार आहे. तसेच पांढरओहळ येथे दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. कैलास पाटील, राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, औरंगाबादचे अध्यक्ष संतोष माने, गंगापूरचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, कृष्णा वल्ले, रामदास परोडकर, खालेद पठाण, सिद्धेश्वर ढोले, निर्मलताई खोबरे, सुमनताई पलाटे, हभप विठ्ठलशास्त्री चनघटे आदी हजर होते.
गंगापूर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:05 AM