लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : शरद सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आ. संदीपान भुमरे यांनी २० पैकी १८ जागा जिंकत शरद सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविला. विशेष म्हणजे आ. भुमरे यांच्याविरुद्ध माजी आमदार चंद्रकांत घोडके यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांनी एकजूट करूनही मतदारांनी त्यांना नाकारले. संदीपान भुमरे यांच्या एकहाती विजयाने संदीपान भुमरे यांची मतदारावरील जादू कायम असल्याचे आजचा निकाल अधोरेखित करून गेला.माजी आमदार चंद्रकांत घोडके यांनी स्थापन केलेल्या शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवाच्या (चौंढाळा) संचालक मंडळाच्या निवडीसाठी २४ रोजी मतदान घेण्यात आले होते. ५२९२ मतदारांपैकी ४१९४ मतदारांनी मतदान केले होते. मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून आ.भुमरे यांच्या रेणुकादेवी पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत कायम राहिली.मतमोजणीनुसार मिळालेली मते व विजयी उमेदवार :ऊस उत्पादक गट नवगाव : सुरेश चौधरी-(२०८९), सुरेश दुबाले-(२००९), नवथर विष्णू-(१९८१). ऊस उत्पादक गट टाकळी : अंबड- संपत गांधले-(१९९७), रावसाहेब घावट-(१९९४), श्रीकृष्ण तांब े(१९३१). ऊस उत्पादक गट विहामांडवा : महावीर काला-(१९९३), लहू डुकरे-(२०१०), ज्ञानोबा बोडखे (१९४३). ऊस उत्पादक गट चौंढाळा : सुभाष गोजरे-(१९९०), माणिकराव थोरे-(२०३७), नंदकुमार पठाडे-( १८९४).ऊस उत्पादक गट कडेठाण : सुभाषराव चावरे-(१९७९), भरत तवार-(२००१), संदीपान भुमरे-(२१३०).महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघ : द्वारकाबाई काकडे-(२०४४), सुमनबाई जाधव-(२०४८). अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ : कल्याण धायकर-(२०५७). इतर मागासवर्गीय मतदारसंघ : सोमनाथ परदेशी (२०४७). विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ : अनिल घोडके (२०७०).विजयी उमेदवारांत माजी आमदार चंद्रकांत घोडके यांच्या सर्व पक्षीय पॅनलच्या अनिल घोडके व श्रीकृष्ण तांबे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत घोडके यांनाही पराभवास सामोरे जावे लागले, मात्र त्यांचे पुत्र अनिल घोडके व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांचे वडील श्रीकृष्ण तांबे यांच्या पदरात विजय पडला आहे. विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतातील फरक काही मतदारसंघांत अल्प असल्याने अपेक्षेप्रमाणे निवडणूक अटीतटीची झाली असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
शरद कारखान्यावर भुमरेंचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:07 AM