शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

मोठे परिवर्तन! नोंदणी पद्धतीने शुभमंगल; अनेकांचा वाढतो आहे कल

By विकास राऊत | Published: November 10, 2023 5:43 PM

सहा. जिल्हा निबंधक तथा विवाह अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी विवाह करण्यात येतो.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात व शहरात गेल्या सहा वर्षांत २८५५ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. नोंदणी पद्धतीने शुभमंगल करण्याकडे अनेकांचा कल वाढत असल्याचे या आकड्यांवरून दिसते आहे. २०१८ पूर्वी १०० ते २०० च्या दरम्यान नोंदणी विवाह होत असत, ते प्रमाण आता दरवर्षी सरासरी ६०० च्या आसपास गेले आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कोठे मिळते?सहा. जिल्हा निबंधक तथा विवाह अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी विवाह करण्यात येतो. नोंदणीनंतर तेथे प्रमाणपत्र मिळते. तसेच महापालिकेतही विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळते.

कागदपत्रे काय लागतात?वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला, त्यात शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखल्याच्या मूळप्रतीसह सत्यप्रती लागतात. तसेच ॲफिडेव्हिट द्यावे लागते. रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, पासपोर्ट यापैकी जो उपलब्ध असेल तो पुरावा व विवाह नोंदणी करताना साक्षीदारांची गरज असते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक कशासाठी?लग्नाचे प्रमाणपत्र अधिकृत कागदपत्र म्हणून कायदेशीर प्रकरणात वापरले जाते. प्रमाणपत्राद्वारे वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्यास मदत होते. कायदेशीर हक्कासाठी लढता येते. मुलांचा कायदेशीर ताबा मिळण्यासाठी तसेच पासपोर्ट सेवा, रहिवासी दाखला मिळण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होतो. लग्नाचा भक्कम कायदेशीर पुरावा मनाला जातो.

सहा वर्षांत किती नोंदणी?२०१८: ३००२०१९: ५०१२०२० : ३२४२०२१ : ४६५२०२२ : ५५९२०२३: ७१० (ऑक्टोबरपर्यंत)

नोंदणी विवाहांचे प्रमाण वाढतेय ....नोंदणी विवाह करण्याकडे कल वाढतो आहे. मागील दोन वर्षांतील आकड्यांवरून ते दिसते. कमी खर्चात विवाह होत असल्यामुळे खर्च, वेळ, श्रम वाचत असल्याने नोंदणी विवाह पद्धतीचे प्रमाण वाढू लागले आहे.-सतीश कुलकर्णी, सहा जिल्हा निबंधक तथा विवाह अधिकारी

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबाद