लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशभरात मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार आणि म्यॅनमार येथे मुस्लिम समाज बांधवांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच इतर मागण्यांसाठी १० सप्टेंबर रोजी मुस्लिम समाज बांधवांनी मुस्लिम इंसाफ कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला.शहरातील जिंतूर रोडवरील इदगाह मैदानातून दुपारी २ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील सुभाष रोड, शिवाजी चौक, गांधी पार्क, मुल्ला मशिद, नारायण चाळ कॉर्नर, विसावा कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मौलाना अब्दुल कादर मिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मौलाना सरफराज, सालेह जावेद याफई, मौलाना तज्जमुल, मौलाना जहांगिर नदवी, मौलाना खुद्दूस मिल्ली, मुफ्ती गौस खासमी, मोहम्मद अलताफ मेमन, सय्यद खादर, काजी जलालोद्दीन, मुफ्ती मिर्झा कलीम बेग, हाफीज चाऊस व मौलाना रफियोद्दीन अश्रफी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मौलाना रफीयोद्दीन आपल्या भाषणात देशातील सरकार मुस्लिम विरोधी असून, मुस्लिम बांधवांवर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. आम्ही कायद्याचा सन्मान करीत असल्याने गप्प आहोत. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा दिला.याप्रसंगी व्यासपीठावर मौलना जहांगिर नदवी, मौलाना मुजीब दहेलवी, मुफ्ती रिजवान, मौलाना खाजा मोईनोद्दीन, मुफ्ती गौस, हाफेज शफी, मुफ्ती कौसर आफाख, खाजी जमिरोद्दीन, हाफेज मोहजीब, मौलाना सिराज, हाफेज रिजवान, मौलाना जहीर अब्बास, हाफेज मुजीबुर रहेमान हुसैनी, मौलाना अब्दुल रशीद, हाफेज निसार आदी धर्मगुरुंसह उपमहापौर माजू लाला, हाफीज चाऊस, गुलाम महंमद मिठ्ठू, कलीम अन्सारी, तय्यब बुखारी, अली खान, जान मोहंमद जानू, गुलमीर खान, मौहम्मद गौस झैन, शेख उबेद शालीमार, नौमान हुसेनी कौसर, शफीक अन्सारी, शेख अहमद, मेराज कुरेशी, सय्यद फारुक बाबा आदींची उपस्थिती होती.सभेनंतर जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना विविध मागण्यांचे पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाखवर नवीन कायदा करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. केंद्र सरकारने मुस्लिम शरियत कायद्यानुसारच नवीन कायदा करावा, यु.ए.पी.ए. कायदा रद्द करावा, गोरक्षकच्या नावावर मुस्लिमांची होणारी हत्या व अत्याचार थांबावावेत, आतंकवाद्याच्या नावाखाली अटकेत असलेल्या निरपराध युवकांना मुक्त करावे, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना त्वरीत अटक करावी, मुस्लिम समाज बांधवांना ५ टक्के आरक्षण द्यावे, पोखर्णी येथे झालेल्या मुस्लिम युवकाच्या मारेकºयांना त्वरीत अटक करावी व या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करावा आदी मागण्या करण्यात आल्या. सभेच्या शेवटी देशात व जगात सुख शांती रहावी, यासाठी सामूहिक दुवा मागण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम समाजाचा मोठा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:58 AM