शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

सुनील केंद्रेकर यांची व्हीआरएस; पण खंडपीठ म्हणाले, त्यांची इच्छा असेल तर ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 16:56 IST

शहर पाणीपुरवठा योजनेचे नेतृत्व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा स्वेच्छा निवृत्तीसाठीचा अर्ज शासनाने आज मंजूर केला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने नागरिक तसेच प्रशासनात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, खंडपीठाने इच्छा असेल तर केंद्रेकर हे शहर पाणीपुरवठा योजनेच्या समितीमध्ये राहून यापुढेही सहकार्य करू शकतात असे म्हंटले आहे. 

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, महत्वाकांशी शहर पाणीपुरवठा योजनेचे नेतृत्व केंद्रेकर करत आहेत. शहर पाणीपुरवठा योजना त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती. सध्या ही योजना अंतिम टप्प्यात आये. दरम्यान, त्यांचा व्हीआरएस अर्ज किमान मार्च २०१४ पर्यंत स्वीकारू नये, अशी विनंती न्यायालयीन मित्राने खंडपीठात केली होती. 

नागरीक म्हणून केंद्रेकर समितीचे सदस्य राहू शकतील

केंद्रेकर यांचा स्वच्छा निवृत्तीचा अर्ज शासनाने मंगळवारी (दि.२७) मंजूर केला आहे. त्यांच्या रिक्तपदावर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची शासनाकडून नियुक्ती केली जाणार असल्याचे मुख्य सरकारी वकील ज्ञानेश्वर डी. काळे यांनी आज सुनावणीवेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. या निवृत्तीनंतर केंद्रेकर शहरातच राहणार असतील व त्यांची इच्छा असल्यास शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर देखरेखीसाठी खंडपीठाने नियुक्त केलेल्या समितीचे ते सदस्य राहू शकतील, असे मत न्या.रविंद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.

‘व्हीआरएस’ अर्ज स्वीकारु नये, असा खंडपीठाचा आदेश नाहीआपण स्वत: खंडपीठात शासनाची बाजू मांडत असतो. शासनाने केंद्रेकर यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर केला आहे. हे पत्र खंडपीठात सादर केले. स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज मंजूर करण्यासंदर्भात केंद्रेकर यांनी दोन वेळा शासनास विनंती केली होती. ती आज मान्य झाली आहे. केंद्रेकर यांचा ‘व्हीआरएस’ अर्ज स्वीकारु नये, असा कुठलाही आदेश खंडपीठाने दिला नाही.- ज्ञानेश्वर डी. काळे, मुख्य सरकारी वकिल.

का घेतली व्हीआरएस?फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात १० हजार एकरी मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद