छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात विशाल एंटरप्रायजेसने बनावट औषधी पुरवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
औषध प्रशासनाने मार्चमध्ये अँटिबायोटिकचे औषधीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातून सदर अँटिबायोटिक बनावट असल्याचे समोर आले आहे. ही औषधी विशाल एंटरप्रायजेसनेच पुरविल्याची माहिती औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अंबाजोगाईतील रुग्णालयास बनावट औषधी पुरवठा केल्याचे समोर आल्यानंतर घाटीतही विशाल एटंरप्रायजेसने ३३ प्रकारची औषधी पुरविल्याचे समोर आले. या औषधींचा वापर तात्काळ थांबविण्यात आला. या औषधींची नमुने तपासणीसाठी घेण्यात आली. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे.