शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:00 IST

जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत १६ मार्च रोजी ५८ टक्के जलसाठा शिल्लक होता. गतवर्षी १६ मार्चला केवळ २५ टक्के जलसाठा होता.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत १६ मार्च रोजी ५८ टक्के जलसाठा शिल्लक होता. गतवर्षी १६ मार्चला केवळ २५ टक्के जलसाठा होता.

मध्यम प्रकल्पात आजचा जलसाठा ४५ टक्के, तर लघु प्रकल्पात ३३ टक्केच उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. मराठवाड्यात जायकवाडी प्रकल्पासह ४४ मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा एकूण जलसाठा क्षमता ५ हजार ९३८ द.ल.घ.मी. आहे. रविवारी मराठवाड्यातील या प्रकल्पांमध्ये २ हजार ६४५ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. एकूण क्षमतेच्या ५८ टक्के हा साठा आहे. गतवर्षी मात्र मराठवाड्यात भयंकर परिस्थिती होती. गतवर्षी मोठ्या प्रकल्पांत केवळ २५ टक्केच जलसाठा उरलेला होता. मोठ्या धरणांप्रमाणेच मध्यम प्रकल्पांची स्थिती असल्याचे दिसून येते. मराठवाड्यात ८१ मध्यम प्रकारची धरणे आहेत. या धरणांची क्षमता १२२५ द.ल.घ.मी. आहे. या धरणांत आज ४७८ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. प्रकल्पीय क्षमतेच्या हा साठा ४५ टक्के असल्याचे दिसून येते. गतवर्षी मात्र मध्यम प्रकल्पांत या तारखेस केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

लघु प्रकल्पांची अवस्था गतवर्षीपेक्षा बरी आहे. मराठवाड्यातील ७९५ लघु प्रकल्पांंची पाणी साठवणूक क्षमता १९३१ द.ल.घ.मी. आहे. आता मात्र या प्रकल्पांत केवळ ५६६द.ल.घ.मी.जलसाठा उरला आहे. एकूण क्षमतेच्या केवळ ३३ टक्के पाणी असल्याचे जलसंपदाकडून सांगण्यात आले. गतवर्षी लघु प्रकल्पांत केवळ १८ टक्केच जलसाठा होता.

प्रकल्प संख्या- आजचा जलसाठा - गतवर्षीचा जलसाठा४४ ----५८%------- २५मध्यम प्रकल्प-आजचा जलसाठा-- गतवर्षीचा जलसाठा८१---------४५%----------२१%लघु प्रकल्प-- आजचा जलसाठा-- गतवर्षीची टक्केवारी७९५------------३३%------१८%

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण