वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतून दुचाकी लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुरेश औताडे (रा.बाळापूर) यांनी २७ जानेवारीला वाळूज एमआयडीसीतील धनंजय एंटरप्रायजेस या कंपनीच्या पार्किंगमध्ये दुचाकी (क्रमांक एम. एच.२०- सी. एम.११७७) उभी केली होती. कुणीतरी अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली.
पंढरपुरात अडीच हजाराची दारू पकडली
वाळूज महानगर : पंढरपुरातील फुलेनगरात अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्या संदीप अंजन पिंपळे यास पोलीस पथकाने पकडून त्याच्या ताब्यातून अडीच हजार रुपये किमतीच्या ४८ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे.
सिडकोत पाण्याची नासाडी
वाळूज महानगर : सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे. सिडको परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या या जलवाहिनीला गळती लागल्याने या ठिकाणी पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत असते. अनेकजण या गळक्या जलवाहिनीच्या पाण्यावर वाहने धूत असल्याचे दिसून येते.
वडगावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात उघड्यावर केर-कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून या भागात नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने या नागरी वसाहतीतील नागरिकांना कायम दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.
बजाजनगरात मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य
वाळूज महानगर : बजाजनगरातील मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. या कामगार वसाहतीतील आर. एम.सेक्टर, आर.एच.सेक्टर, जयभवानी चौकी, बीएसएनएल गोदाम आदी भागातील पथदिवे कायम बंद राहतात. पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातूृन ये-जा करावी लागत आहे.
अनंता सोनुले यांची निवड
वाळूज महानगर : कमळापूर परिसरातील अनंता सुदाम सोनुले यांनी इंडियन मानवाधिकार असोसिएशनच्या गंगापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. असोसिएशनचे बी. एस. यादव यांनी नुकतेच आनंता सोनुले यांना निवडीचे पत्र दिले आहे. (फोटो)