शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर बस मार्शलनं फेकलं पाणी...! दिल्ली पोलिसांनी पलटवली AAP ची कहाणी
2
सातत्याने वाढतायत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, चिन्मय दास यांच्यानंतर आणखी एका आध्यात्मिक गुरूला अटक
3
"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान
4
"ही आमच्या प्रगतीची किंमत..."; अमेरिकेत झालेल्या आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले!
5
कल्याण ग्रामीणमध्ये दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी केला अर्ज!
6
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
7
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
8
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
9
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
10
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
11
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
12
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
13
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
14
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
15
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
16
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
17
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
18
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
19
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
20
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”

'कोट्यवधींचे युनिफॉर्म पडून'; शालेय गणवेश उद्योगाला २५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 5:04 PM

कोरोना परिस्थितीमुळे यंदाही शाळा सुरू होणार नाहीत असे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देराजस्थानमधील भिलवाडा व राज्यातील भिवंडी या शहरांतील मिलमधून गणवेशाचे कापड खरेदी केले जाते. सोलापूर येथील सुमारे ४५० युनिटमध्ये राज्यातील शाळांचे गणवेश शिवले जातात.हेच रेडिमेड गणवेश शहरातील १५ मोठे वितरक विद्यार्थ्यांना विकतात.

औरंगाबाद : यंदाही शाळा उघडण्यासारखी परिस्थिती दिसत नाही. ऑनलाइन शिक्षणावरच भर राहणार आहे. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेश उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शहरात सुमारे २५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. मुलांवर तिचा परिणाम होऊ शकतो, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या परिस्थितीमुळे यंदाही शाळा सुरू होणार नाहीत असे संकेत मिळत आहेत. ऑनलाइन शिक्षणावरच शाळांचा भर असणार आहे. याचा फटका शालेय गणवेश उद्योगाला बसला आहे. शहरात शालेय गणवेशाचे १५ वितरक आहेत. राजस्थानमधील भिलवाडा व राज्यातील भिवंडी या शहरांतील मिलमधून गणवेशाचे कापड खरेदी केले जाते. सोलापूर येथील सुमारे ४५० युनिटमध्ये राज्यातील शाळांचे गणवेश शिवले जातात. हेच रेडिमेड गणवेश शहरातील १५ मोठे वितरक विद्यार्थ्यांना विकतात. नवीन शैक्षणिक वर्षासाठी गणवेशांची ऑर्डर देण्याची सुरुवात जानेवारी-फेब्रुवारीपासूनच सुरू होते. गणवेश बदलणार असेल तर शाळा व्यवस्थापन फेब्रुवारीतच त्याची सूचना वितरकांना देत असतात. त्यानुसार गणवेशांची तयारी सुरू होते.

मागील वर्षी मार्च अखेरीस लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा शहरातील वितरकांकडे ऑर्डरनुसार ५० टक्केे सुमारे १५ कोटींचे गणवेश दाखल झाले होते. लॉकडाऊन व ऑनलाइन शाळांमुळे गणवेश विक्री झाली नाही. डिसेंबर - जानेवारीत नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले होते. पण, आठवड्याभरात तेही बंद झाले. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. मागील वर्षीच्या अनुभव लक्षात घेता यंदा वितरकांनी नवीन गणवेश मागविण्याचे धाडस केले नाही. मागील वर्षीचा साठा अजून पडून आहे. ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका वितरकांनी घेतली आहे.

गणवेश उद्योग ठप्पऔरंगाबाद नव्हेतर, संपूर्ण देशातील गणवेश उद्योग ठप्प आहे. भिलवाडा व भिवंडी येथील कापड मिल बंद आहे. सोलापूर येथील शिलाई युनिट बंद आहेत. तिथे आंध्र प्रदेशातील लोक शिलाईकाम करतात. ते आपल्या गावी गेले आहेत. शाळा उघडण्यासारखी परिस्थिती नाही. याचा परिणाम झाला आहे. गणवेश रिटेलरची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली असून शहरात २५ ते ३० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.- रोमी छाबडा,गणवेश वितरक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाStudentविद्यार्थी