श्यामकुमार पुरे
सिल्लोड : अजिंठा लेण्याच्या दिशेने प्रवास करताना
फिकट गुलाबी गुच्छ लगडलेल्या ग्लिरीसिडियाच्या अर्थात उंदीरमारीच्या झाडांना फुलांचा बहार आला आहे. मात्र सावधान ही चादर विदेशी असून पर्यावरणास व स्थानिक जैवविविधतेस हानीकारक आहे. या झाडाची साधी काडी जरी लावली तरी झाड वाढते. बिया जमिनीवर पडल्या तरी रोप वाढीस लागतात. पानाफुलांच्या वासाने उंदीर, घूस, साप, पाल दूर पळतात. या झाडाच्या मुळ्या आजूबाजूला इतक्या पसरतात की दुसरे देशी, उपयुक्त झाड वा कोणतीही वनस्पती तिथे उगतच नाही. ही झाडे आता शेतकऱ्यांनी बांधावर, घराजवळ लावली आहेत. त्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.
सहज जगणारी झाडे १९७० च्या दशकाच्या शेवटी
वन विभागाने ही मूळची अमेरिकेतील विदेशी सहज जगणारी, पटकन वाढणारी झाडे हरित वने निर्माण करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. फक्त अजिंठ्याच्याच नव्हे तर पळशी, औरंगाबाद जवळचे डोंगर, गौताळा, तालुक्यातील सर्व सामाजिक व प्रादेशिक फॉरेस्टच्या जागेवर ही झाडे लावण्यात आली आहेत. परंतु हळूहळू या झाडापासून होणारे दुष्परिणाम समोर आले आहे. या झाडाखाली कोणतेही देशी गवत उगवत नाही. या झाडांवर कसलाही अधिवास (इको सिस्टीम) नाही. उंदीरमारीच्या झाडाचे शास्त्रीय नाव "ग्लिरीसीडीया सेपीयम" असे आहे. यास आता गिरीपुष्प असे भारतीय, पुरातन भासणारे नाव मिळून तो आपल्या स्थानिक जैवविविधता धोक्यात आल्या आहेत. झुडूप, वेल, लहान सहान वनस्पती उगवत नाही आणि जगतही नाही. या झाडांच्या पाना फुलांमध्ये "इकोस्ट्रेनॉ इक ऍसिड व ग्लिरीसीडीन" या अनेक वासाची रासायनिक घटक आढळतात. त्यावासाने उंदीर, घूस, साप, पाल, पक्षी, माकडे दूर पळतात. जंगलात जिथे ही झाडे तिथे चराऊ गवत उगवत नाही. त्यावर गुजराण करणारे 'ग्रासलँड बर्ड' नाही. तशीच अवस्था अनेक उपयुक्त वेली व झुडुपांची झाली आहे. त्यावर आधारित अन्न साखळी विस्कटली. देशी पर्यावरणास उपयुक्त झाडे वाढायला संधीच ही विदेशी झाडे देत नाहीत. गेल्या चाळीस वर्षांत मोठी हानी आपल्या जैवविविधतेची झाली आहे.
डोंगरालगतच्या अनेक गावांत विषारी साप, सरपटणारे प्राणी, माकडे यांचा गावात वावर अधिक वाढला. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले होते. त्याचे कारणही हीच झाडे आहेत. जंगलात सर्वत्र ही झाडे असल्याने तिथे राहणे या प्राण्यांना अशक्य झाले. त्याचा अधिवास धोक्यात आला म्हणून ती गावाकडे आली. अनेक गावात माकडे धुमाकूळ घालतात. कारण त्यांनाही जंगलात राहणे दुरापास्त झाले आहे. वडाच्या एका झाडावर २८ जातींचे पक्षी, १० हून अधिक जातींचे फुलपाखरे व कीटक अधिवास करतात. विपुल मात्रेत प्राणवायू वातावरण निर्माण होतो. आपण देशी व उपयुक्त वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे. - डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड
----------
(फोटो) कॅप्शन
- हेच ते उंदीर मारीचे ग्लिरीसिडीचे झाड.
सूचना:-फोटो आहे