औंरगाबाद: नाराजीमुळे शिवसेनेचे ठाण्याचे आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठले आहे. त्यांच्यासोबत सेनेचे काही आमदार असल्याची चर्चा आहे. या राजकीय भुकंपावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेत सारकाही आलबेल असल्याची कबुली दिली आहे. तसेच असून शिवसैनिक कुठेही जाणार नाहीत, आम्ही डॅमेज कंट्रोल करू असा ठाम विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेतील शक्तिशाली नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पक्षावर नाराज असून त्यांनी काही आमदारांसह गुजरात सुरत गाठले आहे. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षाचे सरकाराला धोका निर्माण झाला आहे. छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यानंतर सेनेतील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड ठरत आहे. या सर्व परिस्थितीवर सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. खैरे म्हणाले, आज आमदारांना फोन केले पण संपर्क झाला नाही. यासर्व आमदारांच्या मतदार संघात ते नॉट रिचेबल असत्ल्याने नाराजी आहे. त्यांचे काय म्हणे आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणून घेतील. यावर मी मध्यस्थी करून त्याची काय नाराजी आहे हे पक्ष प्रमुखांना कळवले, मनधरणी करणे माझे कामच आहे. पण कडवट शिवसैनिक कुठेही जाणार नाहीत, असा दावाही खैरे यांनी केला आहे.
कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक होईल नाराज आमदारांच्या मतदार संघात त्यांच्या 'नॉट रिचेबल' असल्याने नाराजी आहे. तेथील कट्टर शिवसैनिक देखील यावर लक्ष देऊन आहेत. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्या बंडानंतर कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक झाला होता. तसा प्रकार यावेळी देखील होऊ शकतो. पण जे कोणी आमदार नाराज आहेत त्यांची मनधरणी करून. आम्ही लवकरच डॅमेज कंट्रोल करू, असा ठाम विश्वास खैरे यांनी केला आहे.