शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खैरेंच्या स्मरणशक्तीवर भाजपचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:32 AM

शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देशहरात शांतता महत्त्वाची : शिवसेनेचा मोर्चा तर, आमची मदतफेरी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.खा. खैरे यांना मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे शोभत नाही. शनिवारी रात्री दंगलसदृश स्थितीत तीन वेळा माझ्या फ ोनवरून ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि भाजपचे कुणीही घटनास्थळी नव्हते, असा आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना त्यांनी तातडीने शनिवारी शहरात पाठविले. या सगळ्या घडामोडी माहिती असताना खा.खैरे स्मरणशक्ती गेल्यासारखे मुख्यमंत्री व भाजपवर बेताल आरोप करीत असल्याचा हल्ला आ.अतुल सावे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत चढविला. शहर विकासावर बोलावे, दंगलसदृश स्थितीत कोण होते, नव्हते यावर कशाला बोलता, असा टोलाही त्यांनी खैरेंना लगावला.खैरेंनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, त्यांना निवडून न येण्याची भीती वाटू लागली आहे. हिंदूंच्या रक्षणाचा ठेका त्यांनी एकट्यानेच घेतलेला नाही. दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी ते राजकारण करीत असल्याचा आरोपही भाजपने केला.शिवसेना मोर्चा काढून राजकारण करीत आहे, त्यामुळे शहर आणखी दहा वर्षे मागे जाणार आहे. परंतु आम्ही दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना पुन्हा रोजगार, निवारा देण्यासाठी मदतफेरी काढणार असल्याचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ.भागवत कराड यांनी सांगितले. यावेळी अनिल मकरिये, एकनाथ जाधव, कचरू घोडके, चंद्रकांत हिवराळे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री आणि खैरे यांच्यात विसंवाद४पालकमंत्री डॉ.सावंत शांतता राखण्याचे आवाहन करतात. तसेच दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या बाजूने बोलतात. तिकडे खैरे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनवितात. पालकमंत्र्यांची भूमिका खैरेंना मान्य नाही, असे वाटते आहे.४वातावरण शांत करण्याऐवजी ते भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दंगलीमुळे शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम होतो.४दंगलीत दोन्ही बाजूंनी समाजकंटक कार्यरत होते. जे निर्दाेष असतील त्यांच्या बाजूने भाजप ठामपणे उभे राहील, असे बोराळकर म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा