शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे असेल मिशन
2
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
3
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
4
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
5
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
6
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
7
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
8
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
9
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
10
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
11
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
12
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
13
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
14
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
15
IND vs AUS: सर डॉन ब्रॅडमन यांच्या 'बॅगी ग्रीन' टोपीचा लिलाव, मिळाली मोठी किंमत! आकडा ऐकून थक्क व्हाल
16
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे
17
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार
18
राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं
19
"भारत, तुम्हारी मौत...!; 20 वर्षांनंतर दहशतवादी अझहरचं भाषण, पंतप्रधान मोदी अन् नेतन्याहू यांच्याबद्दल ओकली गरळ
20
Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

भाजपने पाठीत खुपसला खंजीर Vs हिंदू मतांचा सेनेकडून अपमान 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 1:54 PM

काडीमोडचे पडसाद शिवसेना आणि भाजपच्या गोटात उमटले आहेत.

औरंगाबाद : राज्य सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना-भाजप महायुतीचा शुक्रवारी काडीमोड झाला. दोन्ही पक्षांच्या वतीने पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर खोटारडे बोलत असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र याचे पडसाद शिवसेना आणि भाजपच्या गोटात उमटले आहेत. भाजपने विश्वासघात करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरे अशा प्रकारे भाजपची भूमिका असल्याचा आरोप शिवसेनेने केला, तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेने महायुतीचा आणि हिंदुत्वावर प्रेम असलेल्या मतदारांचा अपमान केल्याची टीका केली आहे. 

भाजपने पाठीत खुपसला खंजीर, ठरल्याप्रमाणे भाजप वागला नाहीभाजप आणि शिवसेनेत जे ठरले होते, त्याप्रमाणे भाजप वागलाा नाही. युती करण्यापूर्वी पक्षप्रमुख ठाकरे हे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलले होते. मुख्यमंत्रीपदासह इतर पदांबाबत झालेल्या वाटाघाटींची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे ते खोटे बोलत आहेत, हा भाजपचा आरोप चुकीचा असून, त्यांनी मतदारांचा अपमान केला आहे. - अंबादास दानवे, आमदार 

खोटे बोलण्याची परंपरा नाहीशिवसेनेत खोटे बोलण्याची परंपरा नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली, त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. शिवसेनेवर आरोप करून भाजपने पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपच्या जागा कमी आल्या, नाहीतर त्यांनी शिवसेनेला विचारातदेखील घेतले नसते. भाजप शब्दावर ठाम नसल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले.- त्र्यंबक तुपे, माजी महापौर 

भाजपने स्वार्थ साधलाभाजपच्या सर्व नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मातोश्रीचे उंबरठे झिजविले. लोकसभेत हेतू साध्य झाल्यानंतर शिवसेनेला कवेत घेण्याचा प्रयत्न केला. तरीही सरळ मार्गाने शिवसेनेने साथ दिली. विधानसभेतही बंडखोरी करून शिवसेना उमेदवारांना त्रास दिला. पूर्व मतदारसंघात सेनेने बंडखोरी केली असती तर भाजप विजयी झाले नसते.    - राजू वैद्य, विधानसभा संघटक

भाजपने विश्वासघात केलाभाजपने शिवसेनेसोबत विश्वासघात केला आहे. महायुतीचा निर्णय होताना जे ठरले होते. त्यानुसार भाजपने शिवसेनेसोबत वाटाघाटी करणे गरजेचे होते. परंतु दिलेला शब्द न पाळल्यामुळे भाजपच खोटारड्या भूमिकेने वागत असल्याचे दिसते आहे. ही पद्धत चुकीची आहे.    - विजय वाघचौरे,     शहरप्रमुख

शिवसैनिकांमुळे जागा आल्याभाजपच्या जिल्ह्यात ज्या जागा आल्या, त्या शिवसैनिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आल्या आहेत. तिन्ही मतदारसंघांत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. जे ठरले होते, ते देण्याबाबत समोर येऊन देण्याची दानत पक्षाने दाखविणे गरजेचे होते. - ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख, मुकुंदवाडी 

भाजपला जागा दाखविण्याची वेळभाजपला त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. राजकारणात ठाकरे कुटुंबियांनी आजवर खोटेपणाची भूमिका घेतलेली नाही. तसे पाहिले तर शिवसेनेकडून उशिराच निर्णय झाला. निवडणुकीपूर्वीच हे व्हायला पाहिजे होते. शिवसेनेला संपविण्याचे भाजपचे स्वप्न सातजन्मात पूर्ण होणार नाही.        - सुशील खेडकर, विधानसभा संघटक 

हिंदू मतदारांचा सेनेकडून अपमान सेना हिंदुत्वापासून पळाली शिवसेनेने खऱ्या अर्थाने समर्थन देण्याची वेळ होती; परंतु हिंदुत्वापासून शिवसेना पळाली आहे. हिंदुत्वाला साथ देण्याची वेळ असताना जनतेच्या मतांचा अवमान शिवसेनेने केला आहे. भाजपने काहीही चूक केलेली नाही. - संजय केणेकर, सभापती, म्हाडा 

भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजेभाजपच्या दुपटीने जागा आल्या आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. युती तुटू नये, हिंदुत्वासाठी तरी शिवसेनेने विचार करणे गरजेचे होते. खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पुढे आलीच नाही.- डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप 

युती केली तीच चूक झालीविधानसभा निवडणुकीत युती केली, हीच चूक झाली. १०५ जागा भाजपच्या आलेल्या असताना मुख्यमंत्री शिवसेनेचा कसा होणार, हा प्रश्न आहे. आता लोक बोलू लागले आहेत. शिवसेनेने सोबत येणे गरजेचे होते. - एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष 

हिंदू मतदारांचा अपमान करू नयेहिंदू मतदारांनी युतीला मतदान केले आहे. त्या मतदारांचा अपमान करून शिवसेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करून भाजपशी गद्दारी करणे योग्य नाही. असा विचार शिवसेना नेतृत्वाने करू नये. - शिरीष बोराळकर, प्रवक्ता, भाजप 

नेत्यांनी एकत्रित यावेशिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे अपेक्षित आहे. पक्ष नेतृत्वाच्या चर्चेने जे काही ठरले होते, त्यावर मार्ग निघू शकेल. सत्ता स्थापन करण्याची दोन्ही पक्षांची भूमिका असल्याचे दिसते. - पंकज भारसाखळे, माजी नगरसेवक 

शिवसेनेने सोबत राहिले पाहिजेशिवसेनेने भाजपसोबत राहिले पाहिजे. दोन्ही पक्षांत काय ठरले होते, त्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण? हे तर आम्हाला माहिती नाही; परंतु युतीसोबत शिवसेनेने राहिले पाहिजे. महायुती करून दोन्ही पक्ष मतदारांसमोर गेले होते.     - किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGovernmentसरकार