औरंगाबाद : ‘शिवसेनेच्या वाघाला जखमी करणारी बंदूक भाजपची नव्हतीच’ असा खुलासा (चंद्रकांत खैरे) कुणाचेही नाव न घेता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबादेत आढावा बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना केला.भाजपच्याच बंदुकीने मला घायाळ केल्याचा आरोप शिवसेनेच्या वाघानेच केला आहे, पत्रकारांच्या या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, ती बंदूक भाजपची नव्हतीच. मोदी पंतप्रधान होण्यासाठी जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो, कुणी जागा पाडण्याची हिंमतही करू शकत नाही, असेही स्पष्ट केले. आता जखमी वाघाची नाराजी काढून त्यांना पुन्हा सक्रिय करण्याची तयारी सुरू आहे. लोकसभेतील मंत्रीपदावरून युतीत बिनसल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेविषयी भाष्य करताना ते म्हणाले, लोकसभेच्या प्रदर्शनानुसार विधानसभेतही युतीच सरस राहील. मंत्रिमंडळात काही फेरबदल होणार असून, ते पावसाळी अधिवेशनापूर्वीच होतील. मराठवाड्यात कुणाची वर्णी लागणार, असे विचारले असता त्यांनी अधिवेशनापूर्वी कळेल, असे सांगत स्पष्ट नाव घेण्याचे टाळले. भाजप, सेना युतीचा फार्म्युुला ठरलेला आहे, आम्ही काही ठिकाणी जागा निवडून देखील आणल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी युतीच्या कामाचे कौतुक केले असून, येणाऱ्या काळातही एकमेकांना समजूनच पावले टाकली जाणार आहेत. जागा वाटपावरून नाराजी नव्हती. ती पुढेही राहणार नाही, ‘हमसाथ साथ है’, असेही बोलून दाखविले.
शिवसेनेच्या वाघाला जखमी करणारी बंदूक भाजपची नव्हतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:52 PM
‘शिवसेनेच्या वाघाला जखमी करणारी बंदूक भाजपची नव्हतीच’ असा खुलासा (चंद्रकांत खैरे) कुणाचेही नाव न घेता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबादेत आढावा बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना केला.
ठळक मुद्देयुतीचा फार्म्युला ठरलेला : कोणतीही नाराजी नव्हती, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार- मुनगंटीवार