भोकरदन : भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती भाजपाचे तालुकाध्यक्ष कौतिकराव जगताप तर उपसभापती रामलाल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विनय धोटे, सचिव दादाराव दळवी, संतोष ढाले यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती पदासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष कौतिकराव जगताप यांनी तर उपसभापतीपदासाठी भाजपाचेच रामलाल चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पदाधिकारी बिनविरोध निवडूण आल्याचे जाहीर केले़ बाजार समितीमध्ये भाजपाचे १४ शिवसेनेचे ३ व एक सदस्य काँग्रेसचा आहे. त्यामुळे बाजार समितीचे पदाधिकारी हे भाजपाचेच होणार हे सुरूवाती पासूनच स्पष्ट होते. निवड जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली.यावेळी आमदार संतोष दानवे, निर्मलाताई दानवे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, गणेश बापु फुके, राजेंद्र देशमुख,सभापती संगिता लोखडे, अरूण वाघ, मुकेश चिने,तात्याराव रगडे, कमलाकर सांबळे, रामेश्वर सोनुने, विश्वास सपकाळ, गणेश ठाले, इम्रान पठाण, बालाजी औटी, समाधान शेरकर, गणेशराव वराडे, अनिल गांवडे, जयेश थारेवाल,रमेश मोकासे, मधुकर मुकूटराव, सर्जेराव बरडे, प्रा़ विजय मिसाळ, गजानन तांदुळजे, शांताराम गव्हाणे, गणेश देशमुख, प्रल्हाद शिंदे, लताबाई जाधव, शिलाबाई वाघ,सुमनबाई शेरकर,पंढरिनाथ खरात, सुरेश शर्मा, राजेश जोशी, इरफान पठाण, विठ्ठल चिंचपुरे, रावसाहेब कोरडे, राजकुमार राजपुत, रमेश मुरकुटे, राहुल ठाकुर, यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे पदाअधिकारी उपस्थीतीत होते़ भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला उपसभापतीपदापासुन दुर ठेऊन अन्याय केल्यामुळे येणाऱ्या काळातील सर्व स्थानिक सहकारी संस्थेच्या निवडणुका स्वंतत्र लढविण्यात येतील असा इशारा तालुका प्रमुख कैलास पुंगळे यांनी दिला आहे़४पुंगळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की बाजार समितीची निवडणुक ही भाजपा व सेनेने युतीतुन लढविली होती यामध्ये युतीचे सर्व पॅनल निवडून आले सत्तेच्या भागीदारी मध्ये ६०/४० प्रमाणे सेनेला उपसभापती पद आवश्यक होते मात्र भाजपाच्या संचालकानी खा़रावसाहेब दानवे व आ़ संतोष दानवे यांची दिशाभुल करून दोन्ही पदे भाजपाच्या पदरात पाडुन घेण्याचे चुकीचे काम केले असुन खा़ दानवे यांनी सुध्दा सेनेवर आन्याय केला आहे.
भोकरदन बाजार समितीवर भाजपाचा झेंडा
By admin | Published: September 14, 2015 11:31 PM