लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्या प्रशिक्षणासाठी गेलेले महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना भेटण्यासाठी भाजपचे गटनेते थेट मुसरीला गेले आहेत. मनपा आयुक्त १५ डिसेंबर रोजी शहरात येणार आहेत; पण त्यापूर्वीच मसुरीमध्ये जाऊन त्यांची भेट घेण्याचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे ही भेट का घेतली असावी, याबाबत महापालिकेत विविध तर्क लावण्यात येत आहेत.सातारा-देवळाईमधील नोकर भरती प्रकरणात नगरसेवक राजू शिंदे आणि सभागृह नेते विकास जैन यांनी मागील सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केले होते.महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशाविषयी आयुक्तांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, तेव्हा महापौरांनी सभागृहात खुलासा केला होता की, ही चौकशी आयुक्तांची नाही, तर खालच्या अधिकाºयांची होणार आहे. यानंतर चार दिवसांनी आयुक्त प्रशिक्षणानिमित्त मसुरीला एक महिन्यासाठी रवाना झाले. जाण्यापूर्वी त्यांनी एकाही महत्त्वाच्या फाईलवर सही केली नाही. दरम्यान, प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम काम पाहत आहेत.१५ डिसेंबरनंतर आयुक्तांनी रजेवर जाणे पसंत केल्यास प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकाºयांनाच कायम ठेवावे, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात येणार आहे.स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी मागील आठवड्यात आयुक्त मुगळीकर यांना फोन करून प्रशिक्षणानंतर मनपात रुजू व्हावे आणि शहराच्या विकासासाठी बदली करून घेऊ नये, अशी विनंती केली. मुगळीकरांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे १५ डिसेंबरपासून आयुक्त मनपात रुजू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात असताना शुक्रवारी भाजपचे गटनेते त्यांच्या एका मित्रासोबत मसुरी येथे गेले. या भेटीमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.बापू घडमोडे महापौर असताना भाजपचे गटनेते भोकरदन पॅटर्नवर काम करीत होते. या काळात सत्तेची किल्ली चक्क गटनेत्यांच्या हातात होती. आयुक्त मुगळीकरही ‘समांतर’ सत्तेला कमी पडले होते. त्यांच्या इशाºयावरच आयुक्तांनी काही धाडसी व काही वादग्रस्त निर्णय घेतले होते. या एकतर्फी निर्णयांचा त्रास काही दिवस त्यांना सहन करावा लागला होता.आयुक्तांच्या बदलीची मागणीउलट दौºयावर जाण्यापूर्वी आयुक्तांनी नगरविकास विभागाचे सचिव आणि विभागीय आयुक्तांना ‘मला महापालिकेत काम करण्याची अजिबात इच्छा राहिली नसल्याचे’ कळविले होते. त्यांनी शासनाकडे प्रशिक्षणानंतर बदली करण्याची मागणी तोंडी स्वरूपात केली आहे.
भाजप गटनेते ‘खास’ मसुरी दौ-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:26 AM