शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

भाजपने फोडला सेना नेत्यांना घाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:16 PM

औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली.

ठळक मुद्देनगरसेविकेचे उपोषण : खासदारांच्या विरोधात घोषणाबाजी

औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. सायंकाळी मनपा आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.निवडणुका जवळ येऊ लागताच युतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. महापालिकेत आजपर्यंत भाजपने नेहमी सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मनपात शिवसेना-भाजपची पूर्वीपासून युती आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज भाजपने पाणीप्रश्नाचा मुद्दा उकरून काढला. वॉर्डातील महिला व पुरुषांसह अदवंत यांनी सकाळी १० वाजेपासून उपोषण सुरू केले. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रमोद राठोड आदी यावेळी हजर होते. माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंडपात जाऊन अदवंत आणि नागरिकांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. आंदोलकांचे अजिबात समाधान झाले नाही. दुपारी १ वाजता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक अदवंत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी नागरिकांनी सिडकोवासीयांना पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी खासदारांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काही नागरिकांनी तर आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सिडको एन ३, एन ४ भागात पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून पाणी द्यावे, अशी मागणी करून भाजपने पुन्हा सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले होते. ते काम वर्षभरापासून का होत नाही, असा सवाल काही नागरिकांनी आयुक्तांना विचारला. त्यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या काही नगरसेवकांनी (सेना) विरोध केल्यामुळे काम थांबल्याची माहिती दिली. या उत्तराने संतापलेल्या प्रमोद राठोड यांनी मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल करीत नाहीत, अशी विचारणा केली. शेवटी आयुक्तांनी पाण्याचे समान वितरण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती दिली. आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना