- रामेश्वर श्रीखंडेलासूर स्टेशन: येथे सुरु असलेल्या विकास कामावरून भाजप आमदार प्रशांत बंद आणि बीआरएसचे कार्यकर्त्यांत आज दुपारी राडा झाला. रस्त्याच्या बाजूच्या नालीवर आक्षेप घेत बीआरएस नेते संतोष माने यांनी काम बंद करण्याची मागणी केली. या दरम्यान तेथे उपस्थित असलेले आमदार बंब यांचे समर्थक आणि बीआरएस कार्यकर्ते समोरासमोर आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्हीकडील कार्यकर्त्यांना बाजूला गेले.
सावंगी चौक ते गिताबन याठिकाणी पोलीस बंदोबस्तात ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे. यावेळी बीआरएसचे नेते संतोष पाटील माने हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले. त्याठिकाणी आमदार प्रशांत बंब यांचे समर्थक आधीपासूनच होते. चाळीस फुटावर नाल्या कराव्यात अशा मागणीवरून बीआरएसचे संतोष माने यांची कार्यकारी अभियंता बिरवाडेकर यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बिरवाडेकर तेथून निघून गेले.
दरम्यान, माने यांनी ड्रेनिज लाईनचे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे चिडलेले आमदार बंब समर्थक माने यांच्या अंगावर धाऊन गेले. शाब्दिक चकमक होऊन दोन्हीकडील कार्यकर्ते आपसात भिडले. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्हीकडून कार्यकर्त्यांना बाजूला केले.