खुलताबाद तालुक्यात अतिवृष्टीने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी, मूग, भुईमूग, तूर यांसह संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली होती. मात्र, शासनाने पीकविम्यापासून खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील व कृषी कार्यालयासमोर निदर्शने केली. पीक विमा मंजूर झाला नाही तर, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी उपसभापती युवराज ठेंगडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर, माजी नगरसेवक आशिष कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, मुख्तार पठाण, नीलेश हरणे, संतोष घुशिंगे, अनिस शेख, नारायण मालोदे, फकिरराव मालोदे, दिलीप राठोड आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन: खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यासाठी निवेदन देताना भाजपचे शिष्टमंडळ.
100621\10_2_abd_74_10062021_1.jpg
खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यासाठी निवेदन देताना भाजपचे शिष्टमंडळ.