औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि जालना येथील पाणीप्रश्न हाती घेतला आहे. फुकटचे हंडे वाटून भाजपचा मोर्चा एका उत्सवासारखे झाला. शिवाय मागील काही काळांपासून सत्तेत असताना त्यांनी काहीच केले नाही, सत्तेतून बाहेर पडताच मोर्चा काढायचे, हे भाजपचे उल्लू बनवण्याचे धंदे आहेत, अशी चपराक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी लगावली.
औरंगाबाद आणि जालना येथे पाणी प्रश्न पेटला आहे. दोन्ही ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मोर्चाचे नेतृत्व केले. यावर औरंगाबाद एमआयएमचे खासदार जलील यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी शहरातून काढलेल्या जल आक्रोश मोर्चामुळे माजी मुख्यमंत्री फडणवीस पाणीप्रश्नी गंभीर असल्याचे वाटले होते. परंतु, मोर्चात फुकट हंडे वाटून माणसे बोलावली. तसेच भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे. पालिका, नगरसेवक, आमदार, खासदार राज्य आणि केंद्रात सत्तेत असताना हे प्रश्न का सुटत नाही. भाजपचे आंदोलन म्हणजे लोकांना उल्लू बनविण्याचे काम आहे, अशी चपराक खासदार जलील यांनी लगावली.
इतके वर्ष सत्तेत, बाहेर पडताच आता मोर्चा येथील नागरिकांना माहिती आहे मागील तीस वर्ष यांना मतदान केले. याकाळात यांची सत्ता होती. आमदार, खासदार यांच्या बरोबर देशात आणि राज्यातही भाजपाची सत्ता राहिली. मात्र, या काळात कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. आता सत्तेतून गेल्यास उत्सवासारखे मोर्चे काढायचे. पैसे देऊन, फुकट हंडे देऊन लोकं आणायची. जालन्यात इतके वर्ष दानवे खासदार, मंत्री आहेत. तरीही मोर्चा काढायचा. भाजप जर सत्तेत असताना मोर्चा काढत असेल तर आम्ही काय करायचे असा सवालही खासदार जलील यांनी केला.