निवडीच्या दिवशी सकाळपासूनच काँग्रेसचा एक सदस्य भाजपच्या गळाला लागला होता. त्यामुळे या सरपंच, उपसरपंच निवडणुकीचे चित्र बदलणार अशी शक्यता निर्माण झाली होती. निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना मित्र पक्षांचे आठ सदस्य निवडून आले होते. भाजपचे सात सदस्य निवडून आले होते. आरक्षण जाहीर होताच काँग्रेस, शिवसेना मित्र पक्षांचे आठ सदस्य सहलीवर निघून गेले होते. सोमवारी सरपंच निवडीच्या दिवशी काँग्रेस मित्र पक्षाचे केवळ सातच सदस्य सहलीवरून ग्रामपंचायतीमध्ये आले. एक सदस्य भाजपच्या गळाला लागला. भाजपचे हे आठ सदस्य फुलंब्री येथील रुग्णवाहिकेत बसून ग्रामपंचायत कार्यालयात आले. भाजपकडून सरपंचपदासाठी पाकिजा साबेर पठाण या काँग्रेसमधून फोडलेल्या सदस्य महिलेचा अर्ज दाखल केला, तर काँग्रेस मित्र पक्षांकडून सरपंच पदासाठी प्रतिभा गोविंद पांडे यांनी अर्ज दाखल केला. उपसरपंच पदासाठी शिवराम जगन्नाथ म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीत पाकिजा पठाण व गोपाळ वाघ यांना आठ आठ मते मिळाल्याने त्यांची सरपंच, उपसरपंचपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी नीलेश अहिरे यांनी सहकार्य केले.
फोटो वडोद बाजार