मोर्चाचे नेतृत्व भाजप प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मका, कपाशी, मिरची, अर्द्रक, मूग, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा मोर्चातून देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष कैलास काळे, पं.स. सदस्य संजीवन सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील, शहरध्यक्ष सुनील ठोंबरे, रऊफ देशमुख, वसंत बनकर, बद्री राठोड, विनोद टिकारे, नंदू शेळके, मोरसिंग चव्हाण, मनोज चव्हाण, संजय चव्हाण, रामचंद्र शिंदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
छायाचित्र ओळी : सोयगाव तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चात सहभागी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
200921\img-20210920-wa0091.jpg~200921\img-20210920-wa0085.jpg
सोयगाव-हेक्टरी पन्नास हजार नुकसानी साठी मागणी करतांना थेट बैलगाडी वरून मोर्चा जातांना इंद्रिस मुलतानी, सुरेश बनकर,ज्ञानेश्वर मोठे, कैलास काळे व इतर~सोयगाव-तहसीलदार रमेश जसवंत यांना निवेदन देतांना भाजपाचे शिष्टमंडळ