शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

भाजपानेच घातली नांदेडच्या विकासाला आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:39 AM

काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांना नांदेडच्या विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून निधी खेचून आणत त्यांनी शहराच्या विकासाला मोठी गती दिली. त्यामुळेच आज नांदेडचा चेहरामोहरा बदलताना दिसतो आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा शाश्वत सोयी निर्माण करण्याचा काँग्रेस कार्यकाळात प्रामाणिक प्रयत्न झाला. सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी इलिचपूर, बोंढार प्रकल्प सुरू करण्यात आले तर आसना प्रगतीपथावर आहे. इलिचपूरमधून शेतकºयांना पाणी उपलब्ध झाले आहे तर बोंढारचे पाणी प्रक्रिया करुन गोदावरीत सोडले जाते. शहराच्या सर्वांगिण विकासासाठीही विविध योजनांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आले. मात्र काँग्रेसने सुरू केलेली ही नांदेडच्या विकासाची चळवळ भाजप सरकारच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शहरातील दलित वस्ती सुधारणेसाठी मनपाला २६ कोटीचा निधी जाहीर करण्यात आला. हा निधी नांदेडसाठी वितरीतही करण्यात आला. मात्र तो प्रत्यक्ष मनपाच्या खात्यावर वर्ग न होता जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत राहिला आणि शेवटी सरकारकडे परत गेला. हा निधी भाजपा सरकारने प्रामाणिकपणे नांदेडकरांना दिला असता तर शहरातील दलित वस्त्यांमध्ये अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. भाजपाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे ते होवू शकले नाही. याबाबत आ. अमिता चव्हाण यांनी विधी मंडळातही याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सदर निधी नांदेडला पुन्हा देण्याचा शब्द दिला होता. मात्र सरकारची तीन वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशाच सुडबुद्धीचे राजकारण भाजपा सरकारने स्मार्ट सिटी योजनेमध्येही केले आहे. या योजनेच्या सर्व निकषामध्ये नांदेड शहर बसते. मात्र नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असल्याने या योजनेतूनही सरकारने नांदेडला वगळले. मुंबई-नांदेड रेल्वेबाबतही हाच अनुभव आहे. लातूरहून पुढे नांदेडसाठी रेल्वेला हिरवा कंदील मिळालेला असतानाही ती रोखण्याचे काम भाजपाच्याच मंत्र्यांनी केले. तेच आता महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची धुरा सांभाळत आहेत. नांदेडकर जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आयुक्तालयाचा मुद्दाही लोंढे यांनी यावेळी उपस्थित केला. मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वात मोठे शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. विविध अहवालही नांदेडलाच स्वतंत्र आयुक्तालय व्हावे, असे अनुकुल असताना लातूरकरांनी म्हणजेच भाजपाचे मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यात खोडा घातल्याचा आरोप लोंढे यांनी केला. विकास कामामध्ये कसले पक्षीय राजकारण करता असा सवाल करीत नांदेडकर जनतेचा अशोकराव चव्हाण आणि काँग्रेसवर विश्वास आहे. या निवडणुकीतही मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवून नांदेडमधील मतदार हा ऋणानुबंध कायम ठेवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.