उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी, आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्यात येतील, दोन्ही कोविड रुग्णालय व सोयगाव शहरासाठी रुग्णवाहिका, तर जरंडी व शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन लाईन आठ दिवसात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, शहराध्यक्ष कमलेश कटारिया माजी नगरसेवक सुनील मिरकर यांनी आंदोलन केले.
दोन महिन्यात सिल्लोड तालुक्यात ४९ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मागण्या ८ दिवसात पूर्ण झाल्या नाहीत, तर उपविभागीय अधिकारी कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा मुलतानी यांनी दिला आहे.
-----
कॅप्शन :
भाजप पदाधिकाऱ्यांना मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन देताना उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील.
030521\shyamkumar shivprasad pure_img-20210503-wa0012_1.jpg
सिल्लोड आंदोलन